VIDEO: खचाखच भरलं होतं स्टेडियम, पण मॅच सोडून मांजराच्या 'रेस्क्यू'साठी सरसावले प्रेक्षक!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 10:25 AM2021-09-13T10:25:50+5:302021-09-13T10:28:25+5:30
Cat At Miami College Football Game Survives Fall : प्रेक्षक स्टेडियममध्ये फुटबॉल सामना पाहत असतात, तेव्हाच लोकांच्या नजरा एका मांजराकडे जातात.
अमेरिकेत (America) हजारो लोक Miami Stadium वर फुटबॉल सामन्याचा (Football Match) आनंद घेत होते. मात्र, या दरम्यान स्टेडियममध्ये असे काही घडते की लोकांचे लक्ष सामन्यापासून दूर गेले आणि लोक ओरडू लागले. या घटनेचे व्हिडिओ (Videos) देखील सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये दिसून येते की, या घटनेमागे एक मांजर (Cat) आहे. (Video shows Florida football fans use a U.S. flag to rescue cat that fell from upper deck)
दरम्यान, प्रेक्षक स्टेडियममध्ये फुटबॉल सामना पाहत असतात, तेव्हाच लोकांच्या नजरा एका मांजराकडे जातात. हे मांजर स्टेडियमच्या छताला लटकलेले होते. तसेच, मांजर कित्येक फूट उंचावरून खाली पडण्याच्या मार्गावर होते. हे पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक सामना सोडून ओरडायला लागतात आणि मांजरला वाचवण्यासाठी शक्कल लढवण्याचा विचार करत होते.
दुसरीकडे, स्टेडियमच्या छतावर लटकलेल्या मांजरचा तोल हळूहळू सुटत होता. दरम्यान, छतावरील मांजराची पकड सैल होते आणि ते खाली पडते. मात्र, खाली पडताना मांजरला खालच्या मजल्यावर उपस्थित प्रेक्षकांनी पकडले. हे मांजर पडण्यापूर्वी लोक अमेरिकन ध्वज घेऊन खाली उभे राहिले. मांजर त्याच ध्वजाच्या मध्यभागी पडले आणि त्यांची सुखरूप सुटका झाली. हे पाहून प्रेक्षकांनी आनंदाने उड्या मारल्या.
CAT SURVIVES FALL AT HARD ROCK STADIUM!!!! #SaveTheCatpic.twitter.com/oPNGgfUltZ
— Yianni Laros (@Yiannithemvp) September 11, 2021
यूएसए टुडेच्या एका रिपोर्टनुसार, स्टेडियमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मांजरीला तेथून सुरक्षित ठिकाणी नेले आणि सांगितले की, यात मांजराला कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच, क्रेग क्रोमर या प्रेक्षकाने दावा केला की, मांजराला वाचवण्यासाठी जो ध्वज वापरण्यात आला, तो त्याच्या मालकीचा होता.