३५ मिनिटे वॉशिंग मशीनमध्ये गोल-गोल फिरत राहिली मांजर आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 04:01 PM2019-06-24T16:01:12+5:302019-06-24T16:02:23+5:30
सोशल मीडियावर एकीकडे लोक खुलेपणाने एकमेकांना विरोध करतात. तर कधी दुसऱ्याला मोकळ्या मनाने मदतही करतात.
सोशल मीडियावर एकीकडे लोक खुलेपणाने एकमेकांना विरोध करतात. तर कधी दुसऱ्याला मोकळ्या मनाने मदतही करतात. अशीच एक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील मिनेसोटा येथील लोक सोशल मीडियावर एका मांजरीच्या उपचारासाठी मदत करत आहेत.
फेलिक्स नावाची मांजर वॉशिंग मशीनमध्ये साधारण ३५ मिनिटांपर्यंत अडकून होती आणि आता तिची स्थिती वाईट झाली आहे. जेव्हा मांजर वॉशिंग मशीनमध्ये जाऊन बसली तेव्हा तिच्या मालकीनीला याची अजिबात माहिती नव्हती. त्यामुळे तिने वॉशिंग मशीन सुरू केली. वॉशिंग मशीन एक्सप्रेस मोडवर ठेवून ती बाहेर निघून गेली. जेव्हा ती घरी परतली तेव्हा मांजर वॉशिंग मशीनच्या आता आढळली.
फॅलिक्सने कशाप्रकारे वॉशिंग मशीनमध्ये स्वत:ला जिवंत ठेवलं. पण तिची स्थिती फारच नाजूक आहे. त्यानंतर घरातील महिला मांजरीला मिनेसोटाच्या अॅनिमल इमरजन्सी आणि रेफरल सेंटरमध्ये घेऊन गेली.
या महिलेची मुलगी आशा कॅरोल करचॉफने मांजरीचा मेडिकल खर्च उचलण्यासाठी गो फंड मी पेजवर या घटनेबाबत पोस्ट शेअर केली आणि मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यानंतर जगभरातील लोकांकडून तिला मदत मिळत आहे. आशाने पोस्टमध्ये लिहिले आहे की, या घटनेनंतर परिवातील सर्वांच्या मनाला फार मोठा दु:खं झालं आहे. आतापर्यंत मांजरीला ९८०० डॉलरची मदत मिळाली आहे. त्यांना १० हजार डॉलर जमा करायचे आहेत.
सध्या फेलिक्स मांजरही हॉस्पिटलमध्ये असून ऑक्सिजन सपोर्टच्या मदतीने जिवंत आहे. तिच्या डोळ्यांची दृष्टी गेली आहे. फुप्फुसांमध्ये पाणी भरलं गेल्याने तिला निमोनियाही झाला आहे.