Video : चौकार न दिल्याने क्रिकेट सामन्यात तुंबळ हाणामारी; ६ जण हॉस्पिटलमध्ये, अभिनेत्री ढसाढसा रडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 05:19 PM2023-09-30T17:19:18+5:302023-09-30T17:19:46+5:30

क्रिकेट सामन्यांमधील भांडणे ही नित्याची बाब बनली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी अनेक उदाहरणं देता येतील की खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले आहेत.

Celebrity Cricket League Game In Bangladesh Turns Into WWE Royal Rumble; 6 Hospitalised, Tournament Cancelled, Watch Video | Video : चौकार न दिल्याने क्रिकेट सामन्यात तुंबळ हाणामारी; ६ जण हॉस्पिटलमध्ये, अभिनेत्री ढसाढसा रडली

Video : चौकार न दिल्याने क्रिकेट सामन्यात तुंबळ हाणामारी; ६ जण हॉस्पिटलमध्ये, अभिनेत्री ढसाढसा रडली

googlenewsNext

क्रिकेट सामन्यांमधील भांडणे ही नित्याची बाब बनली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी अनेक उदाहरणं देता येतील की खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले आहेत. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, ही कोणती आंतरराष्ट्रीय मॅच नव्हती, तर सेलेब्रिटी क्रिकेट लीगमधील मॅच होती आणि त्यात तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली.  बांगलादेशमधील सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या सामन्यादरम्यान ही मारामारी झाली आणि ६ जणांना त्यांच्या दुखापतीमुळे  रुग्णालयात दाखल करावे लागले.


पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे चित्रपट निर्माते मुस्तफा कमाल राज आणि दीपंकर दीपोन यांच्या टीममध्ये भांडण झाले.  शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले. काही खेळाडूंनी एकमेकांवर हात उचलण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच बॅटने हल्ला सुरू केला. शिशिर सरदार, राज रिपा, जॉय चौधरी, अतिक रहमान, शेख शुभो आणि आशिक जाहिद अशी जखमींची नावे आहेत. 


माझ्या कारकिर्दीला काही झाले तर मुस्तफा कमाल राज जबाबदार असतील आणि त्यांच्या टीमने माझ्यावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या, असा आरोप राज रिपा यांनी सोशल मीडियावर केला आहे. या अनपेक्षित घटनांमुळे अखेर ही स्पर्धा रद्द करावी लागली.

 

Web Title: Celebrity Cricket League Game In Bangladesh Turns Into WWE Royal Rumble; 6 Hospitalised, Tournament Cancelled, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.