CEO Emotional Post: कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्यावर कंपनीचा CEO ढसाढसा रडला, भावनिक पोस्ट केली शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 09:30 PM2022-08-10T21:30:15+5:302022-08-10T21:32:20+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना

CEO of HyperSocial Braden Wallake cried out load on social media LinkedIn after sacking employees emotional photo post | CEO Emotional Post: कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्यावर कंपनीचा CEO ढसाढसा रडला, भावनिक पोस्ट केली शेअर

CEO Emotional Post: कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्यावर कंपनीचा CEO ढसाढसा रडला, भावनिक पोस्ट केली शेअर

googlenewsNext

CEO crying Emotional Post on Social Media: एका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ने LinkedIn वर कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याची घोषणा केल्यानंतर इंटरनेट वादाला तोंड फुटले. हायपरसोशल सीईओ ब्रॅडन वॉलेक यांनी स्वत: रडत असल्याचे चित्र पोस्ट केले. त्यांना त्यांच्या काही कर्मचार्‍यांना का काढावे लागले, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. १४ तासांपेक्षा कमी कालावधीत त्यांच्या पोस्टला १३ हजारांहून अधिक लाईक्स आणि २ हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या. काही युजर्सने वॉलेक यांचे कौतुक केले, तर काहींनी त्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

“मी आता शेअर करत असलेली पोस्ट म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात दु:खद क्षण आहेत. ही पोस्ट करावी की नाही याचा मी खूप विचार केला पण अखेर आता ही पोस्ट केली आहे. आम्हाला आमच्या काही कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकावे लागले. मी LinkedIn वर गेल्या काही आठवड्यांपासून कॉस्ट कटिंगच्या घटना पाहतोय. त्यातील बरेचसे निर्णय हे अर्थव्यवस्थेमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आहेत. आमच्या कंपनीतील काही निर्णयांना मी स्वत: जबाबदार आहे. मी फेब्रुवारीमध्ये एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर आम्ही बराच काळ काम केले, पण तो निर्णय फसला. मला माहित आहे की माझी टीम म्हणेल की "आम्ही तो निर्णय एकत्र घेतला", परंतु मी त्यातील मुख्य माणूस होतो हे नाकारता येणार नाही. आणि त्या अपयशांमुळे, मला आज माझ्या लोकांना कामावरून काढावे लागले", असं सांगताना वॉलेक यांना अश्रू अनावर झाले.

"पैसा हेच सर्वस्व मानणाऱ्या एखाद्या कंपनीचा मालक म्हणवून घ्यायला मला आवडलं असतं. पण नेमकं तेच मला जमलेलं नाही. 'कर्मचाऱ्यांचे वाटेल ते होऊ दे, आपण पैसा कमवत राहू' असा विचार करणारा मालक मला व्हायचे नाही. मला या पोस्टमधून लोकांना हे दाखवून द्यायचं होतं की प्रत्येक कंपनीचा CEO हा दगडाच्या काळजाचा नसतो. कंपनीतून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेत असताना माझ्यासारख्या काहींना खरंच खूप त्रास होतो. पण नाईलाज असल्याने काही निर्णय घ्यावे लागतात", असेह वॉलेक यांनी स्पष्ट केले.

"माझ्यासारखे भावनांना प्राधान्य देणारे आणखी काही CEO नक्कीच असतील. पण ते अशाप्रकारे सर्वांसमोर येऊन आपल्या भावनांना वाट करून देत नसतील. त्याचं कारण ते १,२ किंवा ३ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करतात. ५-५० किंवा ५००० कर्मचाऱ्यांना थेट काढून टाकत नाही. मला मान्य आहे की माझं माझ्या कर्मचारी आणि सहकाऱ्यांवर प्रेम होतं हे सांगणं प्रोफेशनल वाटत नाही, पण मला आशा आहे की माझे सहकारी आणि कर्मचारी मला समजून घेतील", असेही वॉलेक यांनी सांगितले.

Web Title: CEO of HyperSocial Braden Wallake cried out load on social media LinkedIn after sacking employees emotional photo post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.