खळबळजनक! बाईकस्वार चोरांनी चेन ऐवजी पकडला महिलेचा गळा; अन् मग, पाहा थरारक व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 20:11 IST2020-10-08T19:57:32+5:302020-10-08T20:11:17+5:30
video viral Chain snatchers drag : आता सोशल मीडियावर साखळी चोराचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. 16 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला.

खळबळजनक! बाईकस्वार चोरांनी चेन ऐवजी पकडला महिलेचा गळा; अन् मग, पाहा थरारक व्हिडीओ
कोरोना असो किंवा कोणतीही मोठी आपत्ती असो गुन्हेगारी काही थांबत नाही. उलट अशा माहामारी किंवा आपत्तीजन्य परिस्थितीचा फायदा घेत चोर मोठे डल्ले मारतात. तर अनेकदा चोरी करण्याच्या नादात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो. आता सोशल मीडियावर साखळी चोराचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. १६ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला.
ही भयंकर घटना गुवाहाटीमधील चांदमारी परिसरात घडली आहे. सकाळी सहाच्या सुमारास दोन साखळी चोरांनी बाईकवरून महिलेची चेन चोरण्याचा प्रयत्न केला आणि चेन चोरता चोरता या महिलेचा गळा पडकडला अन् फरपटत घेऊन गेले. या धक्कादायक व्हायरल व्हिडीओमध्ये बाईकच्या वेगात महिला हवेत उडताना दिसत आहे. रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. चोरट्यांनी गळा पडकल्यानंतर ही महिला रस्त्यावर फरपटत आहे. IPL सट्टेबाजीचा पर्दाफाश! यवतमाळच्या क्रिकेट बुकींचा अमरावतीतील अड्डा उद्ध्वस्त
या महिलेचे नाव कबीता दास असून वय ६८ वर्ष आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कबीता दास यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मार लागल्यानं रक्तस्राव सुरू होत होता. हा प्रकार घडल्यानंतर कबीता काही दिवस धक्क्यात होत्या. या घटनेबाबत पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सदर महिलेच्या कुटुंबियांनी गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. लाचखोर हवालदार एसीबीच्या जाळ्यात, गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली पाच हजारांची लाच