पिक्चर अभी बाकी है; विक्रम लँडरचं ठिकाण समजताच उंचावल्या नेटकऱ्यांच्या आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 03:47 PM2019-09-08T15:47:26+5:302019-09-08T15:59:22+5:30

विक्रम लँडरचे फोटो ऑर्बिटरने पाठविल्याचे वृत्त समजताच ट्विटरवर #VikramLanderFound हा हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागला आहे.

Chandrayaan 2 mission isro chief k sivan says we found the location of vikram lander twitter reaction | पिक्चर अभी बाकी है; विक्रम लँडरचं ठिकाण समजताच उंचावल्या नेटकऱ्यांच्या आशा

पिक्चर अभी बाकी है; विक्रम लँडरचं ठिकाण समजताच उंचावल्या नेटकऱ्यांच्या आशा

Next

लँडर विक्रमचं स्थान समजलं असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरनं विक्रमचा फोटो पाठवला आहे. मात्र अद्याप विक्रमशी संपर्क झालेला नाही, असं सिवन यांनी सांगितलं. चांद्रयान 2 ऑर्बिटरनं लँडर विक्रमचा फोटो पाठवला आहे. त्यामुळे लँडरचं स्थान समजलं आहे. आता विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं सिवन म्हणाले. एवढचं नाहीतर त्यांनी हेदेखील संगितलं की, ऑर्बिटरने पाठवलेल्या फोटोमधून विक्रम लँडर कोणत्या स्थितीमध्ये आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, ऑर्बिटरने फोटो पाठविल्याने वृत्त समजताच ट्विटरवर लोकांनी आवाहन केलं आहे की, कृपया प्रार्थना सुरू ठेवा... यश नक्की मिळेल... 

विक्रम लँडरचे फोटो ऑर्बिटरने पाठविल्याचे वृत्त समजताच ट्विटरवर #VikramLanderFound हा हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागला आहे. तसेच इस्त्रो संपूर्ण देश तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही प्रयत्न सुरू ठेवा असेही ट्वीट करून अनेकांनी सांगितले आहे. 

कृपया प्रार्थना सुरू ठेवा... 

आम्ही लँडरचं लोकेशन शोधून काढलं...

आम्ही करून दाखवलं... 

प्रार्थना करा... 

पिक्चर अभी बाकी है... 

अजून शेवट झालेला नाही...

तुमची मेहनत अजिबात वाया जाणार नाही...

गर्व आहे आम्हाला इस्त्रो... 

पुन्हा उंचावल्या कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा... 

तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळणार... 

दरम्यान, चंद्रावर उतरण्यासाठी केवळ दोन किलोमीटरचं अंतर शिल्लक असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. विक्रम लँडरचे चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर असताना त्याचं काम व्यवस्थित सुरू होतं. त्यानंतर विक्रम लँडरचा इस्रोबत असलेला संपर्क तुटला. सध्या या घटनेचं विश्लेषण इस्त्रोकडून सुरू आहे. चांद्रयान-2 मोहीम जवळपास 95 टक्के यशस्वी झाली आहे. चंद्रयान-2 चा ऑर्बिटर जवळपास 7.5 वर्षापर्यंत काम करु शकतो. तसंच, गगनयानसह इस्रोच्या अन्य अंतराळ मोहिमादेखील वेळेतच पूर्ण होणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे.

Web Title: Chandrayaan 2 mission isro chief k sivan says we found the location of vikram lander twitter reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.