शिवजयंतीच्या शुभेच्छा : जय शिवराय....आपल्या मित्र-मैत्रिणींना हे मेसेज पाठवून अधिक जल्लोषात साजरा करा उत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 09:37 AM2020-02-19T09:37:18+5:302020-02-19T09:51:13+5:30

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Wish : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना एकमेकांना शुभेच्छा पाठवल्या जातात. त्यासाठी आम्ही काही सोशल व्हायरल मेसेजेस घेऊन आलो आहोत.

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti : Facebook, Whatsapp, social viral messages to share with your friends and family | शिवजयंतीच्या शुभेच्छा : जय शिवराय....आपल्या मित्र-मैत्रिणींना हे मेसेज पाठवून अधिक जल्लोषात साजरा करा उत्सव!

शिवजयंतीच्या शुभेच्छा : जय शिवराय....आपल्या मित्र-मैत्रिणींना हे मेसेज पाठवून अधिक जल्लोषात साजरा करा उत्सव!

googlenewsNext

(Image Credit : askideas.com)

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. त्यासाठी आम्ही काही सोशल व्हायरल मेसेजेस तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. शिव जयंतीचे हे मेसेज पाठवून तुम्ही सर्वांना शुभेच्छा देऊ शकता.

"जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो ""आपला शिवबा"" होता"
जय शिवराय

सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!
तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !
सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !
"ताज महल अगर प्रेम की निशानी है "
तो "शिवनेरी किला" एक शेर की कहानी है..

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा !

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... सनई-चौघडे वाजू लागले... सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले... भगवा अभिमानाने फडकू लागला... सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली... अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली "अरे माझा राजा जन्मला... माझा शिवबा जन्मला ... दीन-दलितांचा कैवारी जन्माला... दृष्टांचा संहारी जन्मला... अरे माझा राजा जन्मला..." शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा...

जागवल्याशिवाय जाग येत
नाही......
ओढल्याशिवाय काडी पेटत
नाही.......
तसे,
''छत्रपतींचे'' नाव
घेतल्याशिवाय माझा दिवस
उगवत नाही...!!
.शिवजयंतीच्या हार्दिक
शुभेच्छा .
|| जय शिवराय ||

राजे असंख्य झाले आजवर या जगती,
पण ?????
शिवबासमान मात्र कुणी न जाहला..
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला,
एकची तो राजा शिवाजी जाहला..

जय भवानी.!
जय शिवाजी..!
जय महाराष्ट्र...!
गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा..
छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा..

छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र : त्रस्त मोगलांना करणारे,
प : परत न फिरणारे,
ति : तिन्ही जगात जाणणारे,
शि : शिस्तप्रिय,
वा : वाणिज तेज,
जी : जीजाऊचे पुत्र,
म : महाराष्ट्राची शान,
हा : हार न मानणारे,
रा : राज्याचे हितचिंतक,
ज : जनतेचा राजा
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा…
शिव जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा !

इतिहासाच्या पानावर,
रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणी
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती..
मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय शिवराय! जय जिजाऊ!

सूर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता…
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो!

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना “छत्रपती” म्हणतात !

शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे!
जय शिवराय!!

भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…
जय शिवाजी!

अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…
जय शिवराय!

 

Web Title: Chatrapati Shivaji Maharaj Jayanti : Facebook, Whatsapp, social viral messages to share with your friends and family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.