VIDEO : वॉकच्या बहाण्याने गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी गेला पती, पत्नीने दोघांना रंगेहाथ पकडलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 18:21 IST2021-09-30T18:16:22+5:302021-09-30T18:21:58+5:30
Social Viral Video : पती सकाळी-सकाळी एका पार्कमध्ये आपल्या प्रेयसीसोबत बसलेला दिसत आहे. अशात त्याची पत्नी अचानक तिथे पोहोचते.

VIDEO : वॉकच्या बहाण्याने गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी गेला पती, पत्नीने दोघांना रंगेहाथ पकडलं आणि...
एका पत्नीने तिच्या पतीला (Husband Wife Video) एका दुसऱ्या महिलेसोबत पार्कमध्ये रंगेहाथ पकडलं. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत बघू शकता की, पती सकाळी-सकाळी एका पार्कमध्ये आपल्या प्रेयसीसोबत बसलेला दिसत आहे. अशात त्याची पत्नी अचानक तिथे (Wife caught husband red handed) पोहोचते. तेव्हा पत्नी त्याला म्हणाली की, 'अच्छा...तर अशी सुरू आहे जॉगिंग'. जसं पतीने पत्नीला पाहिलं तो पळू लागला.
पत्नीच्या या कमेंटचा अर्थ हा होता की, तो गर्लफ्रेन्डला भेटण्यासाठी रोज जात होता. पण पती पत्नीला हे सांगून जात होता की, तो जॉगिंगला जात आहे. रोज जॉगिंगला जाऊनही पतीचं वजन कमी झालं नव्हतं. त्यामुळे पत्नीला संशय आला. पत्नीने आपल्या पतीचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. आणि तिने त्याला एका दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं. जशी पत्नी त्याच्याजवळ पोहोचली तो पार्कमधून पळाला आणि दुसरी महिलाही पळाली.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक पतीची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'वाह का जमाना आला आहे'. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'पुढे काय झालं, याची वाट बघू'. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ bhutni_ke_memes नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अशाप्रकारच्याच एका घटनेत काही दिवसांपूर्वी एका पतीला त्याच्या पत्नीने दुसऱ्या महिलेला रंगेहाथ पकडलं होतं.