Viral Video: चित्त्याने हरणाची शिकार करण्याचा केला प्रयत्न पण डाव त्याच्यावरच उलटला, कसा? पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 12:52 PM2022-03-16T12:52:07+5:302022-03-16T12:55:02+5:30

हा व्हिडीओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल आणि तुम्हाला हसूही येईल. पहिल्यांदाच साध्या हरिणाऐवजी तुम्हाला हिंस्र चित्त्याचीच कीव येईल.

cheetah trying to hunt deer but fails because of the fence video goes viral on internet | Viral Video: चित्त्याने हरणाची शिकार करण्याचा केला प्रयत्न पण डाव त्याच्यावरच उलटला, कसा? पाहा व्हिडिओ

Viral Video: चित्त्याने हरणाची शिकार करण्याचा केला प्रयत्न पण डाव त्याच्यावरच उलटला, कसा? पाहा व्हिडिओ

googlenewsNext

वाघ, सिंह, चित्ता असे प्राणी समोर दिसले की माणसांनाच नाही तर भल्याभल्या प्राण्यांना घाम फुटतो. अशा प्राण्यांसमोर हरणांचा टिकाव लागणं तर अशक्यच. त्यामुळे असे प्राणी दुरून जरी दिसले तरी हरणं आपला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसतात. पण आता असं हरण दिसलं आहे, जे चक्क चित्त्याला घाबरलं नाही, त्याला सामोरं गेलं आहे. इतक्या जवळ असूनही चित्ता हरणाचं काहीच करू शकला नाही (Cheetah tries to hunt deer viral video).

चित्ता आणि हरणाच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिकारीचा असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. किंबहुना हा व्हिडीओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल आणि तुम्हाला हसूही येईल. पहिल्यांदाच साध्या हरिणाऐवजी तुम्हाला हिंस्र चित्त्याचीच कीव येईल.

व्हिडीओत पाहू शकता एक हरिण गवत खाताना दिसतं आहे. समोरून एक चित्ता दबक्या पावलांनी हरिणाच्या दिशेने येतं. तसं हरिणाला आपल्याजवळ येणारा धोका लगेच करतो. थोडा जरी आवाज आला तरी ते लगेच सावध होतात. पण हे हरिण मात्र जागेवरून बिलकुल हलत नाही. इतकंच नव्हे तर बिबट्या अगदी त्याच्यावर हल्ला करतो, त्याच्या जवळ येतो. पण तरी हरिण काही दचकत नाही, घाबरत नाही आणि भीतीने तिथून पळतही नाही. बिनधास्तपणे ते चित्त्यासमोर उभं राहतं. शांतपणे गवत खाताना दिसतं. चित्ता मात्र हरिणावर हल्ला करण्यासाठी धडपड करत राहतं. इतक्या समोर असूनही चित्ता हरणाचं काहीच बिघडवू शकत नाही.

आता चित्त्याच्या तावडीतून हरिण वाचण्याचं कारण तर तुम्हाला व्हिडीओत दिसेल. ते म्हणजे या दोघांच्या मध्ये असलेलं तारेचं कुंपण.  हा नॅशनल पार्कसारखा परिसर आहे. जिथं हे तारेचं कुंपण लावण्यात आलं आहे (Cheetah attack on deer failed due to fence). ज्यामुळे हरिणाची शिकार करायला आलेल्या चित्त्याची फजिती झाली आहे आणि हरिण मस्त मजेत गवत खात राहिलं आहे. चित्ता तारेचं कुंपण दातांनी चावून तोडण्याचा प्रयत्नही करतं पण तेसुद्धा त्याला शक्य होत नाही. अखेर रिकाम्या हाताने, उपाशी पोटी, शिकार न करताच त्याला मागे परतावं लागतं. हार मानून तो माघार घेतो.

हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. हरिणाचं सर्वांनी कौतुक केलं आहे. तर काही लोकांनी चित्त्याने कुंपणावरून उडी का मारली नाही, असा सवालही उपस्थित केला आहे. त्यावर एका युझरने या प्राण्यांना तारेवरून उडी मारू नये, अशा पद्धतीने ट्रेनिंग दिली जात असावी असं म्हटलं आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. चित्त्याचं विंडो शॉपिंग असं मजेशीर कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

Web Title: cheetah trying to hunt deer but fails because of the fence video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.