कोंबडी पळाली भुर्कन उडाली! कोंबडी चक्क उडतेय हवेत उचं, विश्वास बसत नसेल तर पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 08:52 PM2022-01-30T20:52:54+5:302022-01-30T20:55:09+5:30
सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल (Viral on Social Media) झाला आहे, जो पाहून कोणीही अवाक होईल. हा व्हिडिओ एका कोंबडीचा (Viral Video of Chicken) आहे. यात ही कोंबडी बऱ्याच अंतरापर्यंत हवेत उडताना दिसते. तुम्ही कदाचितच याआधी एखाद्या कोंबडीला इतक्या दूरपर्यंत हवेत उडताना पाहिलं असेल.
पंख असणाऱ्या किंवा हवेत उडणाऱ्या बहुतेक जीवांना आपण पक्षीच म्हणतो. पक्षी उंच डोंगरही उडून अगदी सहज पार करतात. मात्र, काही पक्षी असेही असतात, ज्यांना पंख असूनही उंच उडता येत नाही किंवा काहीच वेळासाठी ते उडू शकतात. हे पक्षी आपल्या पंखाच्या मदतीने खूप दूरवर उडू शकत नाहीत. मात्र, सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल (Viral on Social Media) झाला आहे, जो पाहून कोणीही अवाक होईल. हा व्हिडिओ एका कोंबडीचा (Viral Video of Chicken) आहे. यात ही कोंबडी बऱ्याच अंतरापर्यंत हवेत उडताना दिसते. तुम्ही कदाचितच याआधी एखाद्या कोंबडीला इतक्या दूरपर्यंत हवेत उडताना पाहिलं असेल.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कोंबडी धावत काही अंतरापर्यंत जाते. तिथे जाऊन ती उडण्यासाठी तयारी करू लागते. काही वेळातच कोंबडी आपल्या पंखांच्या मदतीने हवेत उडी घेते. ती फार उंच उडत नाही मात्र बऱ्याच अंतरापर्यंत उडत जाते, हीच बाब आश्चर्यचकित करणारी आहे. सहसा कोंबड्या काहीच मीटर अंतरापर्यंत उडतात. मात्र, या व्हिडिओमधील कोंबडी उडतच बरंच अंतर पार करते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा अनोखा व्हिडिओ @buitengebieden_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, 'हे कधीच माहिती नव्हतं की एक कोंबडी एवढ्या दूरपर्यंत उडते'. अवघ्या 52 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत अडीच लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. तर, 13 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
Never knew a chicken could fly that far.. pic.twitter.com/JU9IwfWxu6
— Buitengebieden (@buitengebieden_) January 29, 2022
अनेकांनी या व्हिडिओ मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, हे मलाही माहिती नव्हतं. दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत लिहिलं, खूप सुंदर, माझ्याकडील कोंबडी तर इतकी मोठी आहे की ती एवढं दूर उडूच शकत नाही. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.