बडे होकर क्या बनोगे? रिपोर्टरच्या या प्रश्नावर चिमुकल्याचं उत्तर ऐकुन तुम्हाला हसु आवरणं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 07:10 PM2022-01-10T19:10:29+5:302022-01-10T19:13:12+5:30
एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याने या प्रश्नाचं इतकं मजेशीर उत्तर दिलं आहे, जे ऐकूनच तुम्ही पोट धरून हसाल (Child funny answer to reporter). त्या मुलाचं उत्तर ऐकून त्याला प्रश्न विचारणारा रिपोर्टरही थक्क झाला (News Reporters).
मोठं होऊन कोण होणार? असं विचारलं तर सामान्यपणे लहान मुलं शिक्षक, डॉक्टर अशी उत्तरं देतात. पण सध्या अशा एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्याने या प्रश्नाचं इतकं मजेशीर उत्तर दिलं आहे, जे ऐकूनच तुम्ही पोट धरून हसाल (Child funny answer to reporter). त्या मुलाचं उत्तर ऐकून त्याला प्रश्न विचारणारा रिपोर्टरही थक्क झाला (News Reporters).
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) घोषणा झालेली आहे. राजकीय पक्ष, नेते तयारीला लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर रिपोर्टरही नागरिकांपर्यंत पोहोचत त्यांच्या समस्या, अपेक्षा जाणून घेत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका रिपोर्टरने एका लहान मुलाला एक प्रश्न विचारला. त्यावर त्या मुलानेही बिनधास्तपणे मजेशीर उत्तर दिलं आहे.
व्हिडीओत पाहू शकता एक रिपोर्टर हातात माइक घेऊन मुलांच्या मध्ये बसला आहे. त्याच्या शेजारी असलेल्या एका मुलाच्या खांद्यावर त्याने हात ठेवला आहे आणि त्याला तो एक प्रश्न विचारतो. मोठं होऊ कोण होणार असं प्रश्न त्या मुलाला तो विचारतो.
मुलगाही अगदी न लाजता बिनधास्तपणे उत्तर देतो. पण तो असं उत्तर देतो ज्याचा आपण विश्वासही केला नसेल. मुलगा सांगतो, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मग आम्ही कोण बनणार? हो, पण मोठं होऊ तेव्हा आम्ही काम करू, आमचं घर उभारू, खाऊ-पिऊ आणि बायकोला आणू आणि काय करणार, दोन-तीन मुलं होतील. यापेक्षा जास्त काय करणार.
मुलाचं हे उत्तर ऐकताच रिपोर्टरलाही हसू येतं. लग्नानंतर दोन-तीन मुलं? असा आणखी एक प्रश्न तो त्या मुलाला विचारतो. तेव्हा मात्र मुलगा भडकतो आणि म्हणतो, मुलं जन्माला नाही घालणार तर काय आम्ही मुलांशिवाय राहणार. हे उत्तर ऐकून तर रिपोर्टरचीही बोलती बंद होते.
bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून मुलाचा बिनधास्त, स्पष्टपणे उत्तर देण्याचं आणि त्याच्या आत्मविश्वाचं कौतुक केलं जातं आहे. काहींनी हा व्हिडीओ मजेशीर वाटतो आहे, पण काहींना या व्हिडीओतील गंभीर बाबही मांडली आहे. एका युझरने, या मुलांना आधी शिक्षण द्या, ज्यामुळे त्यांच्या विचारात बदल होतील, असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे.