कमाल! चिमुरड्यानं हवेत उडी मारत केला 'असा' अविष्कार; स्टंट पाहून तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 06:24 PM2021-01-24T18:24:13+5:302021-01-24T18:25:13+5:30

Viral News in Marathi : एखाद्या ठिकाणी  योग्य प्रशिक्षण घेतल्याप्रमाणे हा मुलगा स्टंट करताना दिसून येत आहे.

Child jump and action in air viral video people react | कमाल! चिमुरड्यानं हवेत उडी मारत केला 'असा' अविष्कार; स्टंट पाहून तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है....

कमाल! चिमुरड्यानं हवेत उडी मारत केला 'असा' अविष्कार; स्टंट पाहून तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है....

Next

सोशल मीडियावर एका चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा भन्नाट स्टंट करताना दिसून येत आहे. एखाद्या ठिकाणी  योग्य प्रशिक्षण घेतल्याप्रमाणे हा मुलगा स्टंट करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत. 

हा व्हिडीओ ट्विटर युजर रुक्षमणी यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत त्यांची लिहिले आहे की, 'जिमनॅस्टिक्स मधला भविष्यातील गोल्ड मेडॅलिस्ट'. हा व्हिडीओ  तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कशाचीही भीती न बाळगता हा मुलगा उंचच उंच उडी मारत आहे. उडी मारताना या मुलानं हवेत आपली कला दाखवायला सुरूवात केली आहे. 'हा' आहे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा सगळ्यात मोठा विक पॉईंट; दिसताच करतात असं काही..... 

दोन्ही पाय हवेत ठेवत हातांनी संपूर्ण शरीराचा तोल सांभालून हा मुलगा उभा आहे. या घटनेचा स्लो मोशन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सनी या  व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काहीजणांनी हा व्हिडीओ सोशल मीडियवर पोस्ट करत क्रिडा मंत्र्यांना ट्विटरवर टॅग करत या मुलाला ट्रेनिंग देण्यासाठी आवाहन केलं आहे. ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला पाहिलं असून २१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केला आहे. १६ महिन्यांच्या मुलीच्या नाकातून काढला ब्रेन ट्यूमर; जगातील सगळ्यात कमी वयाच्या चिमुकलीचे ऑपरेशन

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका मलाला फोटो व्हायरल झाला होता. या मुलाचे नाव पुष्पेंद्र साहू असून सध्या तो इयत्ता सातवीत  शिकत आहे. आईएएस अधिकारी अवनीश शरण यांनी या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून एक आकर्षक कॅप्शन या फोटोला दिलं आहे. 'आग कुठेही असो, मात्र सदैव जळत राहायला हवं.' असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. 

Web Title: Child jump and action in air viral video people react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.