काय सांगता! इथे शिक्षकांसमोर सिगारेट ओढतात विद्यार्थी, पण सवय म्हणून नाही....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:07 PM2019-03-12T16:07:22+5:302019-03-12T16:25:03+5:30

सोशल मीडियात काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात एका कॉलेज क्लासरूममध्ये विद्यार्थी सिगारेट ओढताना दिसत आहेत. हे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

In china college course on tobacco allows student to smoke in class for understanding the subject | काय सांगता! इथे शिक्षकांसमोर सिगारेट ओढतात विद्यार्थी, पण सवय म्हणून नाही....

काय सांगता! इथे शिक्षकांसमोर सिगारेट ओढतात विद्यार्थी, पण सवय म्हणून नाही....

Next

सोशल मीडियात काही फोटो व्हायरल झाले आहेत. याच एका कॉलेज क्लासरूममध्ये विद्यार्थी सिगारेट ओढताना दिसत आहेत. हे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण यात क्लासमधील सर्वच विद्यार्थी सामिल आहेत. हे फोटो चीनमधील सोशल मीडिया Weibo वर समोर आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या फोटोंमध्ये शिक्षकही दिसत आहेत. 

यूनिव्हर्सिटीच्या डीनने जारी केली सूचना

रिपोर्ट्सनुसार, Yunan Agricultural University चे डीन Zhao Zhengxiong यांनी सांगितले की, हे वादग्रस्त फोटो क्लासमध्ये 'तंबाखू' या विषयावर शिकवले जात असतानाचे आहेत. शिक्षिकांनीच वेगवेगळ्या ब्रॅन्ड्सच्या सिगारेट आणल्या होत्या. त्यांनीच विद्यार्थ्यांना या सिगारेट ट्राय करण्यास सांगितले होते. जेणेकरून विद्यार्थी तंबाखूची टेस्ट आणि इतरही गोष्टी चांगल्याप्रकारे समजू शकतील. 

डीनने आपल्या स्पष्टीकरणात सांगतिले की, विद्यार्थ्यांना सिगारेट ओढण्यासाठी बंधन नव्हतं. त्यांना याची गरजही नव्हती. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वत:हून सिगारेट ओढली. तर दुसरीकडे सोशल मीडियात या यूनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांची आणि कॉलेजचा बचाव केला आहे. त्यांनी सांगितले की. तंबाखू या विषयावर सुरू असलेल्या क्लासमध्ये असं करण गरजेचं होतं आणि हा क्लास दररोज नसतो. 

ही स्मोकिंग नाही

विद्यार्थ्यांनी त्यांचा बचाव करत लिहिले की, 'हे स्मोकिंग करणं नाहीये. आम्ही आमच्या प्रोफेशन अंतर्गत याबाबत शिकत होतो आणि समजून घेत होतो'. तर यूनिव्हर्सिटीने सांगितले की, अशाप्रकारे कोणत्याही क्लासआधी विद्यार्थ्यांना सुरक्षेसाठी दिशा-निर्देश दिले जातात. तसेच विद्यार्थ्यांना अशा कोणत्याही क्लासला उपस्थित राहण्यासाठी बंधन घातलं जात नाही.

Web Title: In china college course on tobacco allows student to smoke in class for understanding the subject

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.