बॉयफ्रेन्डच्या पुतण्यासोबत तरूणीचं अफेअर, ३४ लाख रूपये द्यावी लागली नुकसान भरपाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:20 IST2024-12-19T16:18:47+5:302024-12-19T16:20:11+5:30
शांघायच्या एका कोर्टाने एका व्यक्तीला त्याच्या एक्स गर्लफ्रेन्ड द्वारे माफीच्या रूपात देण्यात आलेले ४० हजार डॉलर म्हणजे ३४ लाख रूपये लाख रूपये तिला परत करण्यातून मुक्त केले.

बॉयफ्रेन्डच्या पुतण्यासोबत तरूणीचं अफेअर, ३४ लाख रूपये द्यावी लागली नुकसान भरपाई!
Apology Money Case in Court: रोज जगभरातून प्रेमाची नाती, अनैतिक संबंध, प्रेमात दगा देण्यात आल्याच्या अजब अजब घटना समोर येत असतात. अनेकदा या घटनांची सोशल मीडियावरही चर्चा रंगते. सध्या चीनमधील एका अजब घटनेची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. शांघायच्या एका कोर्टाने एका व्यक्तीला त्याच्या एक्स गर्लफ्रेन्ड द्वारे माफीच्या रूपात देण्यात आलेले ४० हजार डॉलर म्हणजे ३४ लाख रूपये लाख रूपये तिला परत करण्यातून मुक्त केले. ही रक्कम महिलेने अफेअरमुळे नातं वाचवण्यासाठी दिले होते. झालं असं होतं की, बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डवर त्याच्या पुतण्यासोबत अफेअर असल्याचा आरोप केला होता.
महिलेचा भांडाफोड
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, व्यक्तीचं नाव ली आहे आणि महिलेचं नाव सू आहे. त्यांची भेट २०१८ मध्ये झाली होती आणि काही दिवसात त्यांनी डेटिंग सुरू केलं होतं. मात्र, २०२० मध्ये ली याला समजलं की, सू ने त्याच्या पुतण्यासोबत संबंध ठेवले होते. यानंतर ली ने नातं संपवण्याचा विचार केला होता. पण सू ने ली याला एक पत्र पाठवून त्याची माफी मागितली होती. सोबतच चुका सुधारण्याचं आणि नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं होतं.
पैसे पाठवून नातं वाचवण्याचा प्रयत्न
माफीच्या रूपात सू ने दोन दिवसात ली याला ३००,००० युआन ट्रान्सफर केले होते. यानंतर त्यांचं नातं पुन्हा सुरू झालं होतं. पण २०२२ मध्ये पुन्हा ली याला समजलं की, सू चं त्याच्या पुतण्यासोबत अफेअर अजूनही सुरूच आहे. त्यानंतर ली ने नातं पूर्णपणे संपवलं.
नातं तुटल्यावर परत मागितले होते पैसे...
नातं पूर्णपणे तुटल्यानंतर सू ने ३००, ००० युआन म्हणजे ३४ लाख रूपये परत मागितले होते. तिने दावा केला की, ही रक्कम तिने लग्न करण्याच्या अटीवर दिली होती. पण लग्न न झाल्याने हे पैसे तिला परत देण्यात यावे. ली ने तिची ही मागणी नाकारत म्हटलं होतं की, ही रक्कम त्याला भावनात्मक नुकसान भरपाईच्या रूपात देण्यात आली होती.
कोर्टाने दिला निर्णय
यानंतर या वर्षाच्या सुरूवातीलाच कोर्टाने निर्णय देत सांगितलं की, ही रक्कम सू ने ली याला स्वेच्छेने दिली होती. ती परत करण्याची गरज नाही. आता या घटनेची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.