शाब्बास रे पठ्ठ्या! ३ वर्षांपासून रोज मित्राला पाठीवरून घेऊन जातो शाळेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 12:40 PM2019-04-02T12:40:39+5:302019-04-02T12:51:17+5:30
मैत्रीच वेगवेगळी उदाहरणे आपण सिनेमांमधून किंवा खऱ्या आयुष्यातून बघत असतो. पण सिनेमातील मैत्री आपल्या अधिक लक्षात राहते.
मैत्रीच वेगवेगळी उदाहरणे आपण सिनेमांमधून किंवा खऱ्या आयुष्यातून बघत असतो. पण सिनेमातील मैत्री आपल्या अधिक लक्षात राहते. एकमेकांसाठी वाट्टेल ते करणारे अनेक मित्र आपण पाहिले असतील. तुमचेही असे मित्र असतील. पण मैत्रीचं एक असं उदाहरण सध्या सोशल मीडियात गाजत आहे जे तुम्ही कधी पाहिलं नसेल. चीनच्या Sichuan शहरातील ही घटना आहे. Xu आणि Zhaang ६व्या वर्गात शिकतात. Zhaang हा चालू शकत नाही, त्यामुळे त्याचा मित्र Xu त्याला स्वत:च्या पाठीर घेऊन रोज शाळेत जातो.
(Image Credit : Daily Mail)
Xu हा जेव्हा चार वर्षांचा होता तेव्हा त्याला एक आजार झाला होता. या आजाराचं नाव आहे Rag Doll Disease. हा एक कधीच बरा न होणारा आजार आहे. यात व्यक्तीला चालण्याची समस्या होते. Xu ला त्याच्या या आजारात मदत करण्याची जबाबदारी त्याचा मित्र Zhang याने घेतली. Zhang रोज त्याच्या मित्राला पाठीवर शाळेत घेऊन जातो. हे गेली तीन वर्षे तो सतत करत आहे.
(Image Credit : PressFrom)
Zhang ने सांगितले की, त्याला त्याच्या मित्राची मदत करण्यात काहीच अडचण नाही. त्याचं वजन ४० किलो आणि त्याच्या मित्राचं वजन २५ किलो आहे. त्यामुळे यात त्रास होण्यासारखं काही नाही. Zhang सांगतो की, 'आम्ही दोघे बेस्ट फ्रेन्ड्स आहोत. रोज तो माझ्यासोबत बसून अभ्यास करतो. आम्ही सोबतच असतो. सोबत खेळतो सुद्धा'. आजकाल अशी मैत्री फारच कमी बघायला मिळते.