रस्त्यावरून चालताना महिलेसमोरच कोसळली भिंत; बघा धक्कादायक व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 02:54 PM2019-07-16T14:54:10+5:302019-07-16T14:57:28+5:30
एक महिला रस्त्यावरून जात असतानाच, एक भिंत कोसळली असल्याचे एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी चीनमध्ये झालेल्या एका घटनेने अनेकांना हैराण करून सोडलं आहे. एक महिला रस्त्यावरून जात असतानाच, एक भिंत कोसळली असल्याचे एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून दिसून येत आहे. या अपघातातून महिला थोडक्यात बचावली असून सदर घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. खरं तर ही महिला रस्त्यावरून चालत असताना त्या रस्त्यावरील भिंत कोसळली. महिला या घटनेतून बचावली असून तिथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्यांचं मात्र नुकसान झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
CGTN ने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी चीनच्या गनजाऊ शहरामध्ये ही घटना घडली. येथील स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका तुटलेल्या पाइपमधून येणाऱ्या पाण्याने भिंत कमकुवत झाली. ज्यामुळे भिंत कोसळली आहे. या घटनेमध्ये कोणीही जखमी झालं नसून तीन गाड्यांचं नुकसान झालं आहे.
चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.
चीनमध्ये घडलेल्या घटनेप्रमाणेच काही दिवसांपूर्वी मुंबईमध्येही असाच काहीसा प्रकार घडला होता.
मालाड पिंपरीपाडा येथे जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून जवळपास 22 जण ठार झाले असल्याची घटना घडली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ही भलींमोठी भिंत कोसळली होती. हे वृत्त ताजे असतानाच मुंबईतील डोंगरी भागातील कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.