चीनच्या बॉडी बिल्डर डॉक्टरची रंगली चर्चा, कोरोना पीडितांसाठी आली समोर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 11:45 AM2020-02-03T11:45:07+5:302020-02-03T11:45:14+5:30
या बॉडी बिल्डर डॉक्टरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत.
चीनमध्ये कॅरोना व्हायरसने थैमान घातलंय. मीडिया रिपोर्ट्नुसार, जगभरात याचे ७, ७०० रूग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. यापासून बचावासाठी लोक वेगवेगळे उपाय करत आहेत. पण अजूनही यावर ठोस उपाय सापडला नाही. अशात चीनची एका महिला डॉक्टरची चर्चा रंगली आहे. या डॉक्टरचं नाव आहे Yuan Herong. ही महिला डॉक्टर तर आहेच सोबतच बॉडीबील्डरही आहे. ती म्हणाली की, लोकांना शक्य ती मदत करण्यासाठी तयार आहे.
Yuan Herong ने इन्स्टाग्रामवर लिहिले की, '१७१ नविन केस नोंदवण्यात आल्या आहेत. १५, २३८ लोक सस्पेक्ट आहेत. आम्ही या व्हायरसपासून लोकांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि यावर ट्रीटमेंटही शोधू'.
ती एका दुसऱ्या पोस्टमध्ये हॉस्पिटलमध्ये दिसते आहे. याला तिने कॅप्शन दिले आहे की, 'मी एक डॉक्टर आहे. मी नेहमीच पुढे राहीन. या महामारीपासून वाचण्यासाठी माझं बेस्ट देईन'.
Yuan Herong पारंपारिक चीनी औषधांचा अभ्यास केला आहे.
तसेच २०१६ मध्ये तिने वर्कआउट करणे सुरू केलं होतं.
त्यानंतर ती प्रोफेशनल बॉडी बिल्डींगमध्ये भाग घेऊ लागली. तेव्हापासून ती चांगलीच चर्चेत आली.
तिचे बॉडी बिल्डींगचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेतात.
तिने काही टीव्ही मालिकांमध्येही कामे केली आहेत.