एकापेक्षा जास्त वेळा टॉयलेटला गेल्यास कर्मचाऱ्यांनी दंड भरावा; या’ कंपनीचा अजब फर्मान
By प्रविण मरगळे | Published: January 8, 2021 03:38 PM2021-01-08T15:38:49+5:302021-01-08T15:46:48+5:30
कर्मचारी आळसी असतात, त्याच्या कामाच्या कौशल्यात सुधारणा आणण्यासाठीच एकावेळेपेक्षा जास्त टॉयलेट ब्रेक घेतला तर त्यांच्यावर दंड आकारण्यात येईल.
बिजींग – संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटात ओढणाऱ्या चीनमधील कंपनी सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना जो आदेश दिलाय तो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल अन् हसू येईल. आता तुम्ही विचार करत असाल या कंपनीने कर्मचाऱ्यांना काय आदेश दिला असेल? तर थांबा आम्ही तुम्हाला याचबाबत सांगत आहोत, या कंपनीने दिलेल्या अशाप्रकारच्या आदेशाने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
चीनमधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना अजब आदेश दिला आहे, दक्षिण चीनमध्ये असणाऱ्या या कंपनीचं म्हणणं आहे की, जर कर्मचारी एकापेक्षा जास्त वेळा टॉयलेटसाठी ब्रेक घेत असेल तर त्याला दंड आकारण्यात यावा, चीनची कंपनी अंपू इलेक्ट्रॉनिक्स साइन्स एँड टेक्नॉलॉजीने असा आदेश दिला आहे. कर्मचारी आळसी असतात, त्याच्या कामाच्या कौशल्यात सुधारणा आणण्यासाठीच एकावेळेपेक्षा जास्त टॉयलेट ब्रेक घेतला तर त्यांच्यावर दंड आकारण्यात येईल.
चीनच्या गुंआंगडोंग परिसरातील दोंगगुआन स्थित कंपनीने कर्मचाऱ्यांना एका वेळेपेक्षा जास्त वेळा टॉयलेटला जाण्यासाठी ब्रेक घेतला तर २० युआन दंड आकारण्यास सुरूवात केली आहे. कर्मचाऱ्यांची अशी वर्तवणूक ही कंपनीच्या शिस्तीविरोधात आहे असं कंपनीने म्हटलं आहे. कंपनीने २० आणि २१ डिसेंबर रोजी ७ कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे दंड लावला आहे. हा नियम चार्ली चॅपलिनचा बहुचर्चित सिनेमा मॉडर्न टाइम्समधील संबंधित पाहिलं जात आहे.
ज्या कर्मचाऱ्यांकडून दंड आकारला त्यांना पुन्हा परत दिला
चार्ली चॅपलिनच्या या सिनेमात असं दाखवण्यात आलं आहे की, टॉयलेटला जाण्यापूर्वी पहिल्यांदा कर्मचाऱ्याला स्वत:च्या बॉसकडे नोंदणी करावी लागेल. कंपनीने लावलेल्या टॉयलेट नियम तोडल्यावर दंड याची दोंगगुआन प्रशासनाचं लक्ष गेलं असून त्यांनी संबंधित घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा नियम अवैध आहे. त्यांनी कंपनीला आदेशात सुधारणा करण्यास सांगितलं असून ज्या कर्मचाऱ्यांकडून अशाप्रकारे दंड घेतला आहे त्यांना पुन्हा परत करावा असं म्हटलं आहे.
तर कंपनीचे मॅनेजर काओ यांनी सांगितले आहे की, कंपनीने कर्मचाऱ्यांना दंड भरावा असं सांगितलेले नाही. तर दंड त्यांच्या मासिक वेतनातील बोनसमधून वजा करण्यात येत आहे. कंपनीला हा निर्णय यासाठीच घ्यावा लागला कारण काही कर्मचारी वारंवार टॉयलेटला जाऊन सिगारेट ओढतात आणि कामाची वेळ योग्यरित्या पाळत नाहीत. आम्ही मजबूर आहोत, पण सत्य आहे की, हे कर्मचारी आळसी होते, व्यवस्थापनाने त्यांना नेहमी समज दिली परंतु त्यांच्या वागणुकीमध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे कंटाळून कंपनीला अशारितीने निर्णय घ्यावा लागला.