अरे बापरे! एकाचवेळी १८ मुलांशी डेटिंग, एकच चूक झाली, उघड झालं सगळ गुपितं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 01:39 PM2023-04-08T13:39:17+5:302023-04-08T13:39:31+5:30

आतापर्यंत तुम्ही बँकेत, राजकारणात झालेले घोटाळे पाहिले असतील.

chinese married girl dating 18 boys at one time finally arrested by police | अरे बापरे! एकाचवेळी १८ मुलांशी डेटिंग, एकच चूक झाली, उघड झालं सगळ गुपितं

अरे बापरे! एकाचवेळी १८ मुलांशी डेटिंग, एकच चूक झाली, उघड झालं सगळ गुपितं

googlenewsNext

आतापर्यंत तुम्ही बँकेत, राजकारणात झालेले घोटाळे पाहिले असतील. हे घोटाळे आपल्याकडे सतत होत असतात. प्रेम प्रकरणातही अनेक घोटाळे तुम्ही पाहिले असतील. पण, सध्या एक असाच घोटाळा समोर आला आहे. यात एका तरुणीचा एक, दोन नाही तर तब्बल १८ तरुणांसोबतचा घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी तरुणांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले आहे. 

या तरुणीने १८ तरुणांसोबत डेटिंगवर जात फसवणूक केली आहे. ती सर्वांकडून पैसे उकळत होती. तिने सर्वांना लग्न करणार असल्याचे सांगितले होते.

ही घटना चीनच्या शांघायमधील आहे. २०१७ पासून आतापर्यंत तिने १८ तरुणांना एकत्र डेट केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मुलीचे २०१४ मध्येच लग्न झाले होते, तिला एक मूलही आहे. यानंतरही तिने त्या सर्व तरुणांची फसवणूक केली आहे.

पैशांसाठी तिने तरुणांची फसवणूक केली. ती त्यांच्यासोबत डेटवर जायची . पण तिने कधीही सत्य सांगितले नाही आणि ती इतर किती मुलांना डेट करत आहे हे देखील सांगितले नाही. एक तरुणाला तिची चूक निर्दशनास आली आणि या मुलीचे बिंग फुटले.

"आमचा अखेरचा फोटो..."; सेल्फी घेतल्यानंतर गर्लफ्रेंडसमोरच बॉयफ्रेंडचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, काही तरुणांनी तरुणीला लग्नासाठी विचारले, त्यानंतर तिने त्यांना टाळण्यासाठी विविध कारणे पुढे केली. यानंतर यातील एका तरुणाला संशय आला. शेवटी काहींनी पैसे परत मागितले, यावेळी तिने नकार दिला. यावेळी पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यानंतर अखेर तपासानंतर तिचा घोटाळा उघड झाला आणि त्या तरुणीला अटक केली.

Web Title: chinese married girl dating 18 boys at one time finally arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.