Video - छोटू दादाने सलमान-शाहरुखलाही टाकलं मागे; पाणीपुरी विकून मिळवले कोट्यवधी व्ह्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 01:48 PM2023-03-31T13:48:46+5:302023-03-31T13:49:41+5:30

छोटू दादा असं या लोकप्रिय कलाकाराचं नाव आहे. सध्या सोशल मीडियावर यूट्यूबर शफीक नाटियाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

chotu dada has left behind even salman khan and shah rukh khan in popularity made billions views | Video - छोटू दादाने सलमान-शाहरुखलाही टाकलं मागे; पाणीपुरी विकून मिळवले कोट्यवधी व्ह्यूज

फोटो - NDTV

googlenewsNext

बॉलिवूडच्या अनेक स्टार्सच्या चित्रपटांची गाणी आणि व्हिडीओ अनेकदा यूट्यूबवर व्हायरल होतात. चाहत्यांनाही त्यांच्या आवडत्या स्टार्सचे व्हिडीओ खूप आवडतात. यामुळेच कलाकारांच्या गाण्यांना आणि इतर व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळतात. पण तुम्ही असा कलाकार पाहिला आहे का, ज्याचे व्हिडिओ व्ह्यूज लाखो नाही तर अब्जावधीत आहेत. या व्यक्तीने अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खानसारख्या कलाकारांनाही मागे सोडले आहे. 

छोटू दादा असं या लोकप्रिय कलाकाराचं नाव आहे. सध्या सोशल मीडियावर यूट्यूबर शफीक नाटियाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 'छोटू के गोलगप्पा' असे या व्हिडिओचे नाव आहे. या कॉमेडी व्हिडिओमध्ये लोक पाणीपुरी खाताना आणि कॉमेडी करताना दिसत आहेत. शफीक नाटिया या व्हिडीओमध्ये आहे. 

कॉमेडी व्हिडीओ यूट्यूबवर शेअर होऊन चार वर्षे झाली असली तरी लोकांना तो नेहमीच आवडतो. यामुळेच 'छोटू के गोलगप्पा'च्या व्हिडिओला एकूण 1,696,598,521 व्ह्यूज मिळाले आहेत. लाईक्सबद्दल बोलायचे तर, 'छोटू के गोलगप्पा'च्या व्हिडिओला 6 मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. आता पुन्हा एकदा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

विशेष म्हणजे यूट्यूबर शफीक नाटिया सोशल मीडियावर छोटू दादाच्या नावाने प्रसिद्ध आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याची फॅन फॉलोइंगही खूप जास्त आहे. चाहत्यांना छोटू दादाचे व्हिडीओ खूप जास्त आवडतात. तसेच त्याच्या अभिनय आणि व्हिडीओवर कमेंट आणि कौतुक करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: chotu dada has left behind even salman khan and shah rukh khan in popularity made billions views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.