Viral Video: शुजमध्ये लपून बसला होता कोब्रा, हात लावताच झपकन बाहेर आला अन् फणा काढुन उभा राहिला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 12:23 PM2022-07-13T12:23:31+5:302022-07-13T12:27:20+5:30

आपणही पावसात कपडे, बूट तपासून घेतो, नीट झाडून घालतो (Snake video viral). पण कधी यामध्ये सापही असू शकतो, याचा स्वप्नात तरी तुम्ही विचार केला असेल का? असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Cobra hiding inside a shoe lunges at woman trying to rescue it video goes viral on social media | Viral Video: शुजमध्ये लपून बसला होता कोब्रा, हात लावताच झपकन बाहेर आला अन् फणा काढुन उभा राहिला

Viral Video: शुजमध्ये लपून बसला होता कोब्रा, हात लावताच झपकन बाहेर आला अन् फणा काढुन उभा राहिला

googlenewsNext

पावसाळा म्हटलं की बरेच कीडे, कीटक आणि इतर जीव दिसू लागतात. घराबाहेरच नव्हे तर घरातही असे जीव दिसतात. त्यामुळे बूट, कपडे यामध्ये असे छोटे-मोठे जीव असण्याची शक्यता असू शकते, याची कल्पना आपल्याला असते. त्यामुळे आपणही पावसात कपडे, बूट तपासून घेतो, नीट झाडून घालतो (Snake video viral). पण कधी यामध्ये सापही असू शकतो, याचा स्वप्नात तरी तुम्ही विचार केला असेल का? असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Snake Hiding in Shoe Video).

एका बुटामध्ये कोब्रासारखा खतरनाक साप लपून बसला होता. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता एका घरात शूरॅकवर बऱ्याच चपला ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका बुटामध्ये एक महिला काठी टाकताना दिसते आहे. ती बुटामध्ये काठी टाकून हलवते आणि बऱ्याच वेळाने त्या शूझमधून एक भलामोठा साप बाहेर येतो. हा साधासुधा साप नव्हे तर विषारी खतरनाक कोब्रा साप आहे. जो बाहेर येताच आपला फणा काढून उभा राहतो (Snake Came Out Of Shoe).

सापाची आकार पाहून इतक्या छोट्याशा बुटांमध्ये तो लपून राहू शकतो, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. महिला काठीने त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न करते. मध्येच साप त्याच्यावर हल्ला करतानाही दिसतो. तेव्हा आपल्या अंगावरही काटा येतो.  महिला या सापाला पकडताना काहीतरी सांगतानाही दिसते आहे. ती म्हणते, पावसाळ्याच्या दिवसात कुठेही विषारी कीटक, कीडे आणि असे प्राणी लपून राहतात. त्यामुळे सांभाळून राहायला हवं.

सापाची आकार पाहून इतक्या छोट्याशा बुटांमध्ये तो लपून राहू शकतो, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. अवघ्या 53 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण खूप भयंकर आहे. आयपीएस अधिकारी सुशांत नंदा यांनी  @susantananda3  या आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पावसाळ्यात साप कोणत्याही जागी असू शकतात, त्यामुळे सावध राहा. असं कॅफ्शन त्यांनी या व्हिीओला दिलं आहे.

Web Title: Cobra hiding inside a shoe lunges at woman trying to rescue it video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.