Girl Dance Video: लाल साडीतल्या मुलीने डान्स करून घातला धुमाकूळ, लोक म्हणाले- आग लगा दी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 17:08 IST2023-05-03T17:06:56+5:302023-05-03T17:08:01+5:30
मुलीने अशा अप्रतिम डान्स मूव्ह केल्यात की विचारायलाच नको

Girl Dance Video: लाल साडीतल्या मुलीने डान्स करून घातला धुमाकूळ, लोक म्हणाले- आग लगा दी...
Girl in Saree Dance Video: सोशल मीडियावर एका मुलीचा अप्रतिम डान्स मूव्ह्स दाखवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही व्हिडीओ क्लिप कॉलेजच्या एका फंक्शनदरम्यान शूट करण्यात आल्याचे समजते. त्यात लाल साडीत एक मुलगी 1993 मध्ये आलेल्या 'खलनायक' चित्रपटातील 'चोली के पीछे क्या है' या सुपरहिट गाण्यावर नाचताना दिसत आहे. मुलीने असा अप्रतिम डान्स केला आहे की सारेच तिचे फॅन होताना दिसतायत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही लाल साडीत एक मुलगी स्टेजवर उभी असल्याचे पाहू शकता. यानंतर 'चोली के पीछे क्या है' हे गाणे सुरू होताच ती मुलगी अप्रतिम नाचू लागते. मुलीची प्रत्येक स्टेप पाहण्यासारखी आहे. ती एक प्रशिक्षित नृत्यांगना आहे असे तिच्या डान्सकडे पाहून वाटते. प्रेक्षागृहात बसलेले लोक त्याच्या प्रत्येक कृतीवर टाळ्या शिट्ट्यांचा जल्लोष करतात आणि डान्सचा आनंद घेत आहेत, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ खूप आवडेल. पाहा व्हिडीओ-
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @videoonation.teb नावाच्या अकाउंटवर ही अप्रतिम क्लिप शेअर करण्यात आली आहे. काही तासांतच या व्हिडिओला साडे सात हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. याशिवाय लोक अनेक कमेंट करत आहेत. एक युजर म्हणाला, या मुलीच्या डान्सने स्टेजला आग लावून दिली असंच म्हणायला पाहिजे, तर दुसऱ्या लिहिले की ही स्वत: खूपच चांगली डान्सर आहे. तिने अप्रतिम नृत्य केले. तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, आता मला या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावाच लागेल. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, या मुलीने साऱ्यांचीच मनं जिंकली.