बियर्ड हटाओ, प्यार बचाओ! कॉलेजमधील मुलींचं आंदोलन; म्हणाल्या, गर्लफ्रेंड हवी की दाढी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:07 PM2024-10-19T14:07:44+5:302024-10-19T14:08:14+5:30

मध्य प्रदेशातील इंदूर येथे महाविद्यालयीन तरुणींनी केलेले आंदोलन सर्वांचे लक्ष वेधत आहेत.

College girls demand clean-shaved men in indore, watch here video  | बियर्ड हटाओ, प्यार बचाओ! कॉलेजमधील मुलींचं आंदोलन; म्हणाल्या, गर्लफ्रेंड हवी की दाढी...

बियर्ड हटाओ, प्यार बचाओ! कॉलेजमधील मुलींचं आंदोलन; म्हणाल्या, गर्लफ्रेंड हवी की दाढी...

Indore girls demand beardless boyfriend : देशातील विविध शहरांमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन आंदोलने सुरू असतात. शेतकरी, नोकरदार, सरकारी नोकरी करणारा, पेन्शनधारक असो की मग कोणत्याही क्षेत्रातील महिला... पीडित लोक आंदोलनाचे हत्यार उपसून आपला आवाज बुलंद करत असतात. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अनेकदा अनोखे प्रयोग करुन प्रशासनाचे लक्ष वेधले जाते. पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर स्थानिक डॉक्टरांनी संप पुकारला... पण, आता मध्य प्रदेशातील इंदूर येथे महाविद्यालयीन तरुणींनी केलेले आंदोलन सर्वांचे लक्ष वेधत आहेत. या मुलींची मागणी आणि अनोख्या घोषणा यामुळे हे आंदोलन लक्षवेधी ठरले. 

दरम्यान, आंदोलनादरम्यान महाविद्यालयीन तरुणींनी पोस्टरबाजीदेखील केली. 'बियर्डलेस बॉयफ्रेंड की तमन्ना अब हमारे दिल में है', बियर्ड हटाओ, प्यार बचाओ, बियर्ड रखो या गर्लफ्रेंड रखो चॉइस तुम्हारी, नो क्लीन शेव्ह नो लव्ह, अशा आशयाचे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधत आहेत. आंदोलनाच्या व्हिडीओमध्ये मुलींनी चेहऱ्यावर प्रतिकात्मक दाढी लावल्याचे दिसते. तसेच त्यांच्या हातात बॅनर आणि पोस्टर्स आहेत. नेटकरी मात्र या आंदोलनाची फिरकी घेत भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. 

दाढीशिवाय मुलांचे सौंदर्य अपुरे असते असा अनेकांचा समज आहे. तर दाढी हे पुरुषांचे वैभव असल्याचे अनेकजण सांगतात. याबद्दल मत-मतांतरे आहेत. दाढी असलेला पुरुष इतर पुरुषांच्या तुलनेत खूप आकर्षित करतो असेही बोलले जाते. इंदूरमधील तरुणींनी आपल्या या आंदोलनाच्या माध्यमातून मुलांना दाढी न ठेवण्याचे आवाहन केले. तरुणींच्या या आंदोलनाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'आमचे शरीर आमची निवड, 'हे मुलींचे जरा जास्तच होत आहे', 'सर्वप्रथम विकी कौशलला हा सल्ला द्यायला हवा', 'आमची दाढी आमची चॉइस'.

Web Title: College girls demand clean-shaved men in indore, watch here video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.