Trending Viral Video: लाईव्ह शो मध्ये घुसली भरधाव कार? अँकर्सची जीव वाचवण्यासाठी धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 08:17 PM2022-07-11T20:17:55+5:302022-07-11T20:18:38+5:30

असं कसं घडलं.. पाहा व्हिडीओ

Comedy video news anchors running in between tv show viral high speed car footage social media users laugh trending | Trending Viral Video: लाईव्ह शो मध्ये घुसली भरधाव कार? अँकर्सची जीव वाचवण्यासाठी धावाधाव

Trending Viral Video: लाईव्ह शो मध्ये घुसली भरधाव कार? अँकर्सची जीव वाचवण्यासाठी धावाधाव

googlenewsNext

Trending on Internet: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ पोस्ट केले जातात. यातील काही गोष्टी अशा असतात की ज्यांना पुन्हा-पुन्हा बघूनही हसू आवरता येत नाही. अशाच एका व्हिडिओला सध्या खूप व्ह्यूज मिळत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओचे कॅप्शनही खूप मजेशीर देण्यात आले आहे. एका बातम्यांच्या शो दरम्यान मागून अचानक भरधाव कार येते आण त्यानंतर जो गोंधळ उडतो, तो या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये दोन अँकर बसून अँकरिंग करत असतात. त्यावेळी असे काही घडते की अचानक दोघेही घाबरतात आणि आपापल्या जागेवरून उठतात आणि पळत सुटतात. दोघांच्याही चेहऱ्यावर प्रचंड भिती दिसते. पण शेवटी, अँकर इतके का घाबरतात ते कळतं आणि ते स्वत:वरच हसू लागतात. पाहा हा व्हायरल व्हिडिओ-

अँकरच्या मागे एक मोठी स्क्रीन लावलेली असते. या स्क्रीनवर एक कार अँकरच्या दिशेने येताना दिसते. पण ही फक्त एक स्क्रीन आहे हे कदाचित अँकर विसरतात. ही गाडी त्यांच्या स्टुडिओत येणार असं त्यांना वाटतं. त्यामुळे भीतीने दोघेही जागेवरून उठून पळू लागतात आणि बघता बघता फ्रेममधूनही गायब होतात.

हा व्हिडिओ पाहून लोक अँकरची खूप खिल्ली उडवत आहेत. आत्तापर्यंत 6.3 दशलक्षाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याला लाखो लोकांनी लाईक केले आहे आणि हजारो लोकांनी रिट्विट देखील केले आहे. काही लोक मीम्स शेअर करतानाही दिसत आहेत. तर काहींनी केवळ हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत.

Web Title: Comedy video news anchors running in between tv show viral high speed car footage social media users laugh trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.