काकूंच्या समर्थनार्थ काकांचा व्हिडीओही व्हायरल; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच मागितला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 11:25 AM2020-08-31T11:25:28+5:302020-08-31T11:27:24+5:30

रविवारी दिवसभर १८०० रुपयांवरुन वाद घालणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

Comedy video viral in Social media demanded the resignation of CM Uddhav Thackeray | काकूंच्या समर्थनार्थ काकांचा व्हिडीओही व्हायरल; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच मागितला राजीनामा

काकूंच्या समर्थनार्थ काकांचा व्हिडीओही व्हायरल; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच मागितला राजीनामा

Next
ठळक मुद्देप्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी माणसं काहीही करु शकतात हे या व्हिडीओतून सिद्ध होतं.१८०० रुपयांवरुन वाद घालणाऱ्या महिलेच्या समर्थनार्थ काकांनी बनवला व्हिडीओविनोदी शैलीतून भाष्य करत लोकांचे केले मनोरंजन

मुंबई – सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल याचा नेम लागत नाही. रविवारी दिवसभर एका काकूचा व्हिडीओ नेटिझन्सकडून प्रचंड व्हायरल करण्यात येत होता. यावरुन अनेक मिम्सही तयार करण्यात आले. राज्याच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या व्हिडीओच्या आधारे जीडीपी मुद्द्यावरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

अनेकांनी काकूंच्या व्हिडीओ व्हायरल करत जोक्स बनवले, यात एका व्यक्तीने विनोदी शैलीत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले. या काकांचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काका म्हणतात की, ५०० च्या तीन नोटा आणि ३०० रुपये कधीही अठराशे होत नाही, यापूर्वीही ते झाले नाही, भविष्यातही हे होणार नाही, कदाचित राज्य सरकार, केंद्र सरकार बदलेल पण अठराशे कधी होणार नाही. या मराठी मावशी आहेत त्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. या प्रकरणाची सीबीआयची मागणीही गंमतीशीरपणे या व्यक्तीने केली आहे.

इतकचं नाही, या मावशीचे १५ लाख मोदींनी बुडवले, किती जणांनी त्यांची फसवणूक केली आहे. या तरुणांचा निषेध करतो, लॉकडाऊनमुळे लोकांना कामं मिळत नाही, काम केल्यावर पैसे मिळत नाही, या मावशीने किती सहन करायचं? त्यांच्या अशिक्षितपणाचे किती फायदा उचलावा? असा सवाल त्यांनी केला आहे. मोदींनी नवीन नोटा बदलल्या, दहाची नवीन नोट काढली, वीसची नवीन नोट निघाली, शंभर, पाचशेची आणि दोन हजारांची नवी नोट काढली, मग अठराशेची का नाही? या मावशीच्या फसवणुकीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे असं सांगत त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच राजीनामा मागितला आहे. हा व्हिडीओ नेटीझन्सकडून करमणूक म्हणून व्हायरल करण्यात येत आहे. मात्र प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी माणसं काहीही करु शकतात हे या व्हिडीओतून सिद्ध होतं.

दरम्यान, मनोरंजनाची बाब सोडली तर या व्हिडीओची गंभीर दखल राज्यातील ठाकरे सरकारकडून घेण्यात आली आहे. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, घरकाम करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मेहनत करून घर चालवणाऱ्या या महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे या महिला भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा कणा आहेत. हिशोबात चूक होणं, हा थट्टेचा विषय होऊ नये अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आर्थिक साक्षरतेवर कार्यक्रम राबवले जातात. ही घटना आम्ही आमच्यासाठी आव्हान म्हणून पाहत आहोत. आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही लवकरच कार्यक्रम हाती घेत आहोत असंही मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले आहे.

Web Title: Comedy video viral in Social media demanded the resignation of CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.