अरे बाप रे बाप! एका कंडोमच्या पाकिटाची किंमत ६० हजार रूपये, लोकही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 01:49 PM2022-07-05T13:49:58+5:302022-07-05T13:50:21+5:30
याच्या किंमतीत कोणीही जाऊन एखादा ब्रँडेड टीव्ही विकत घेऊ शकतो.
अनेक देशांमध्ये सरकारद्वारे मोफत कंडोम उपलब्ध करून दिले जातात. परंतु एक देश असाही आहे, जिकडे एका कंडोमच्या पॅकेटची किंमत जवळपास ६० हजार रूपये आहे. दरम्यान, व्हेनेझुएलामध्ये कंडोमचं एक पॅकेट ६० हजार रूपयांपर्यंत विकलं जात आहे. याची किंमत इतकी महाग असली तरी स्टोअर्सच्या बाहेर मात्र लोकांची गर्दी दिसून येते.
व्हेनेझुएलामध्ये कंडोमच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेतच, पण दुसरीकडे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. व्हेनेझुएलामध्ये हे वृत्त सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हेनेझुएलामध्ये गर्भपात करणं हा एक गुन्हा आहे. जर कोणी असं करताना पकडलं गेलं, तर त्यांच्याविरोधात मोठ्या शिक्षेचीही तरतूद आहे. संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट २०१५ नुसार व्हेनेझुएलामध्ये तरूणींमध्ये गर्भधारणेची अनेक प्रकरणं समोर आली होती.
व्हेनेझुएलामध्ये बाजारांत काही स्थानिक ब्रँडच्या कॉन्ट्रासप्टिव्ह पिल्सही उपलब्ध आहेत. परंतु ते सुरक्षित मानले जात नाहीत. काही रिपोर्ट्सनुसार लोक प्रत्येक महिन्याला आपली अर्धी सॅलरी कंडोम आणि पिल्ससारख्या गोष्टींवर खर्च करत आहेत. किंमती इतक्या वाढल्या असल्या तरी सरकारनं त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. व्हेनेझुएलावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादले होते. त्यानंतर या ठिकाणी अनेक गोष्टींचे भाव गगनाला भीडले आहेत.