गाजलेला मेडिकल कॉलेजमधला Dance Video चर्चेत, पुन्हा सापडला वादाच्या कचाट्यात, वाचा कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:20 PM2021-04-12T13:20:08+5:302021-04-12T13:30:51+5:30

Trending Viral Video : डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघंही चर्चेत आले आहेत. दोघांनी हा व्हिडीओ कॉलेजमध्ये शूट केल्याचं दिसून येत आहे. 

Controversy over viral dance video of medical college students from kerala | गाजलेला मेडिकल कॉलेजमधला Dance Video चर्चेत, पुन्हा सापडला वादाच्या कचाट्यात, वाचा कारण

गाजलेला मेडिकल कॉलेजमधला Dance Video चर्चेत, पुन्हा सापडला वादाच्या कचाट्यात, वाचा कारण

Next

सोशल मीडियावर नेहमीच डान्सचे व्हिडीओज (Viral Dance Video) व्हायरल होत असतात.  असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ फक्त व्हायरल झाला नाही तर वादाच्या कचाट्यातही सापडला आहे.  हा व्हिडीओ केरळमधील दोन मेडिकल स्टूडंट्सचा आहे. 

व्हिडीओमधील तरूण तरूणी 1978 मधील हीट रासपुतिन गाण्यावर डान्स करत आहेत. यातील एका विद्यार्थ्याचं नाव नवीन के रजाक तर विद्यार्थीनीचं नाव जानकी ओमकुमार असं आहे. दोघंही त्रिसूर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत. डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघंही चर्चेत आले आहेत. दोघांनी हा व्हिडीओ कॉलेजमध्ये शूट केल्याचं दिसून येत आहे. 

२३ मार्चला हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ नेटिझन्सना तुफान आवडल्यामुळे व्हायरल झालेला पाहायला मिळाला. पण मागच्या  दोन दिवसात काही लोक या प्रकाराला याला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडिओमध्ये पाहिल्या गेलेल्या मुलाचं नाव नवीन के रजाक असं आहे. याच कारणामुळे अनेकांनी या दोघांवर टिका केली आहे. 

सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.. 

कृष्णा राज नावाच्या एका फेसबुक युजरनं लिहिलं, की जानकी आणि नवीन. त्रिसूर मेडीकल कॉलेजच्या या दोन्ही विद्यार्थ्यांचा डान्स व्हिडीओ भरपूर व्हायरल झाला आहे. यांचं पूर्ण नाव जानकी ओमकुमार आणि नवीन के रजाक असं आहे. यात काही शंका नक्कीच आहेत. जानकीच्या घरच्यांनी अधिक सावध राहायला हवं. चला जानकीच्या नवऱ्यासाठी आणि नवीनच्या बायकोसाठी प्रार्थना करूया.

नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार

काही  युदर्सनी या दोन विद्यार्थ्यांचीच बाजू घेत असल्याचं चित्र आहे. शुक्रवारी कॉलेज यूनियननं गाण्यावर इतरही अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. यासोबतच विरोध करणाऱ्यांसाठी ते म्हणाले, 'जर तुमचा हेतू राग आणि संतापाच असेल तर आम्ही यात अडथळा आणण्याचं ठरवलं आहे.'

Web Title: Controversy over viral dance video of medical college students from kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.