Corona positive girl : १० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 12:02 PM2021-05-13T12:02:58+5:302021-05-13T12:07:00+5:30

Corona positive girl : डॉक्टरांनी स्वतः या तरूणीचा (Doctor Praises Her) व्हिडीओ शेअर करून कौतुक केलं आहे.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

Corona positive girl fighting for his life in covid emergency ward bravely doctor praises her see viral video | Corona positive girl : १० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ

Corona positive girl : १० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं भारतात कहर केला आहे. रोज ३ लाखांपेक्षा जास्त प्रकरणं समोर येताना दिसत आहेत.  कोरोना व्हायरसच्या या लाटेत जास्तीत जास्त तरूणांना संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. डॉक्टर्सही त्यांचा जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत.  सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. ज्यामुळे एकमेंकाना आजाराशी लढण्यात हिंमत मिळत आहे.

दिल्लीतील एका रुग्णालयात भरती असलेल्या ३० वर्षीय कोरोना रुग्ण तरूणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Girl Fighting For His Life In Covid Emergency Ward) डॉक्टरांनी स्वतः या तरूणीचा (Doctor Praises Her) व्हिडीओ शेअर करून कौतुक केलं आहे.  सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

हॉस्पिटलमधील इमरजेंसी फिजिशियन डॉक्टर मोनिका लेंगे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, मुलीच्या तोंडावर ऑक्सिजनचा मास्क आहे आणि 'लव्ह यू झिंदगी ...' हे गाणे चालू आहे. डॉक्टर मोनिकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'ही मुलगी केवळ 30 वर्षांची आहे आणि तिला आयसीयू बेड मिळालेला नाही.

कोरोनामुळे एका व्यक्तीचा २ वेळा मृत्यू; तिरडीवर ठेवताच श्वास घेऊ लागला, मग त्याच एम्ब्यूलेंसनं रुग्णालय गाठलं

कोविड इमरजेंसीमध्ये गंभीर स्थितीत उपचार सुरू झाले. गेल्या 10 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. एनआयव्ही सहाय्य करत आहे, तिला रेमेडिसवीर देण्यात आला आहे आणि प्लाझ्मा थेरपी देखील केली आहे. मुलीची इच्छाशक्ती जोरदार आहे. आज तिने मला गाणे वाजवण्यास सांगितले. मी मान्य केले. कधीही हार मानू नका.

आधी जीभ खाल्ली मग स्वतःची जागा मिळवली; माश्याच्या तोंडात आढळला लिंग बदलणारा किडा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ ८ मे  रोजी शेअर करण्यात आला होता. आता या व्हिडीओला  ९ लाखांपेक्षा अधिकवेळा पाहिले गेले आहे. तर ४० हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि ८ हजारांपेक्षा जास्ति रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. कमेंट्स सेक्शनमध्ये या मुलीचे कौतुक करण्यासाठी लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

Web Title: Corona positive girl fighting for his life in covid emergency ward bravely doctor praises her see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.