Corona virus : कोरोनापासून बचावासाठी जवानांनी केलं असं काही, पहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 03:35 PM2020-03-25T15:35:38+5:302020-03-25T15:41:29+5:30
जवानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मशीन दाखवण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी संपूर्ण देशात लॉकाडाऊन करण्यात आलं आहे. एकमेकांपासून लांब राहण्याासाठी आणि स्वच्छता बाळगण्यासाठी विविध स्तरातून आवाहन केलं जात आहे. सोशल मिडीयावर हात धुण्याच्या वेगवेगळ्या पध्दती दाखवल्या जात आहेत.
अशा परिस्थितील भारतीय सैन्यातील जवानांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये एक मशीन दाखवण्यात आली आहे. या मशीनला कोणताही स्पर्श न करता पाणी आणि सॅनिटायजर उपलब्ध होतं. या मशीनला हातांनी नाही तर चक्क पायांनी ऑपरेट केलं जातं. या मशीनच्या मदतीने व्यक्ती आपल्या हातांना स्वच्छ करू शकतो. पण नळ आणि सॅनिटायजरच्या बॉटलला कोणताही स्पर्श न करता हात धुतले जाणार आहेत.
Innovation, thy name is Indian Forces!!
— Gautam Gambhir (@GautamGambhir) March 24, 2020
Supercool hand sanitising mechanism!!
Great job!! #IndiaFightsCoronapic.twitter.com/t2EghPgpY5
हा व्हिडीओ गौतम गंभीर याने शेअर केला आहे. हे उल्लेखनीय काम भारतीय सेनेच्या जवांनाचं आहे. या व्हिडीओत या मशीनचा वापर कसा करायचा याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडीओला 6 हजार लाईक्स आणि 31 हजारापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. या व्हिडीओत दावा करण्यात आला आहे कि ही मशीन पब्लिक प्लेसवर लावण्यात येईल.
हे मशीन हेडक्वार्टर एसएमटी वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आलं आहे. या मशीनला हँडज् फ्री मेकॅनिझम असं म्हटलं आहे. या व्हिडीओतून असा दावा करण्यात आला आहे की ही मशीन पब्लिक प्लेस वर जास्त वापरली जाऊ शकते. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळायला मदत होईल.