Corona virus : आता कोरोनाच्या भीतीने बकऱ्यांना सुद्धा घातलाय मास्क, व्हिडीओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 01:42 PM2020-03-22T13:42:53+5:302020-03-22T13:54:50+5:30
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. हा प्राण्यांचा व्हिडीओ टिकटॉकवर हा शेअर केला आहे.
जगभरासह भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. कोरनाचा प्रादुर्भाव वाढू नये याासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होतना दिसून येत आहेत. देशात शनिवारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढलेल्याची माहिती मिळत आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.
@rohitdas3188♬ original sound - khilesh shing rajput
प्राण्यांपासून कोरोना होतो असा अफवांचा संदेश फिरत होता. त्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर माणसांपासूनच कोरोनाची लागण होऊ नये म्हणून बकऱ्यांना मास्क चढवल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. २४ हजारांपेक्षा अधिक लोकांनी हे व्हिडीओ लाईक केले आहेत. टिकटॉकवर हा व्हिडीयो शेअर केला आहे. ( हे पण वाचा-Coronavirus : कनिका कपूर ठरली 'कमोनिका', योगी आदित्यनाथांनीही उरकलं तिचं नामकरण...)
या व्हिडीओमध्ये बॅगराऊंडला कोरोना व्हायरसवर तयार केलेली गाणी वाजत आहेत आणि बकऱ्या आणि कुत्र्याला मास्क, पिशव्यांनी तोंड बांधलं आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी हे करण्यात आलं आहे. माणसांप्रमाणेच प्राणांनाही त्याचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली आहे. यातून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण प्राण्याची काळजी कशाप्रकारे घेऊ शकतो. यासाठी हा व्हिडीयो टाकण्यात आला आहे. ( हे पण वाचा-Corona virus : 'डोकं जड होऊन डोळ्यांमध्ये वेदना, कडवट तोंड', कोरोनाग्रस्त महिलेने सांगितला अनुभव)