Coronavirus : लॉकडाउनमुळे कुत्र्याला ड्रोनसोबत बाहेर पाठवलं फिरायला, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:53 PM2020-03-21T12:53:03+5:302020-03-21T12:57:04+5:30

लोक घरातच वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. घरातूनच काम करत आहेत. त्यामुळे लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना फिरायला घेऊन जाऊ शकत नाही.

Coronavirus : Drone walks with dog for man on coronavirus lockdown in cyrpus video goes viral api | Coronavirus : लॉकडाउनमुळे कुत्र्याला ड्रोनसोबत बाहेर पाठवलं फिरायला, व्हिडीओ व्हायरल

Coronavirus : लॉकडाउनमुळे कुत्र्याला ड्रोनसोबत बाहेर पाठवलं फिरायला, व्हिडीओ व्हायरल

Next

कोरोना व्हायरसमुळे वेगवेगळ्या देशातील लोकांनी स्वत:ला घरांमध्ये बंद करून घेतलं आहे. लोक घरातच वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. घरातूनच काम करत आहेत. त्यामुळे लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना फिरायला घेऊन जाऊ शकत नाही. बाहेर गेले तर कोरोनाचा धोका. अशात एकाने भन्नाट आयडिया काढली. त्याने त्याच्या कुत्र्याला ड्रोनसोबत बाहेर फिरायला पाठवलं.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कुत्रा ड्रोनसोबत बाहेर फिरत आहे. त्याची दोरी ड्रोनला बांधली आहे. हा व्हिडीओ सायप्रसचा असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ Vakis Demetrious ने शेअर केला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियातून चांगलाच पसंत केला जात आहे. लोकांना ही आयडिया फार आवडली असून अनेकजण तशा कमेंटही करत आहेत. याने ना तुम्हाला कोरोनाची लागण होईल, ना कुत्रा पळून जाईल.


Web Title: Coronavirus : Drone walks with dog for man on coronavirus lockdown in cyrpus video goes viral api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.