Coronavirus : कोरोनापासून बचावासाठी चिमुकलीचा सुपरहिट जुगाड, तुम्हीही म्हणाल, क्या बात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 01:51 PM2020-03-20T13:51:54+5:302020-03-20T13:52:07+5:30

कोरोनापासून बचावासाठी सोशल मीडियात अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडीओ फारच लक्ष वेधून घेत आहे. 

Coronavirus : Kids toothpick idea lets people minimize physical contact in lift api | Coronavirus : कोरोनापासून बचावासाठी चिमुकलीचा सुपरहिट जुगाड, तुम्हीही म्हणाल, क्या बात!

Coronavirus : कोरोनापासून बचावासाठी चिमुकलीचा सुपरहिट जुगाड, तुम्हीही म्हणाल, क्या बात!

googlenewsNext

कोरोना व्हायरसला मात देण्यासाठी जगभरातील लोक वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. डॉक्टर, नर्सेस आणि प्रशासन मेहनत घेत आहेत. नागरीकही त्यांना सहकार्य करत आहेत. काही लोकांनी स्वत:ला घरात लॉकडाउन केलं आहे. कोरोनापासून बचावासाठी सोशल मीडियात अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडीओ फारच लक्ष वेधून घेत आहे. 

सिंगापूरमध्ये लिफ्टचं बटन दाबताना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कंडोमचा वापर केला होता. पण भारतातील एका व्हिडीओ एका लहान मुलीने फारच भन्नाट आयडिया काढली आहे. याने लोकांना लिफ्टच्या बटनाला स्पर्श करण्याची गरजच पडणार नाही. या मुलीचं लोक खूप कौतुक करत आहेत.

नोएडातील एका लहान मुलीने ही आयडिया काढली आहे. लोकांनी लिफ्टचं बटन दाबू नये म्हणून ही आयडिया करण्यात आली आहे. या मुलीने एक थर्माकॉल लिफ्ट बटनाच्या बरोबर वर लावलाय, ज्यावर भरपूर टूथपिक्स लावले. लोक या टूथपिक्सच्या मदतीने बटन प्रेस करू शकतात. याने लोक कोरोनापासून बचाव करू शकतात. इतकेच नाही तर एकदा वापरलेली टूथपिक फेकण्यासाठी एक छोटं डस्टबिनही तिने केलं आहे.

तुमच्या बिल्डींगमध्ये तुम्हीही अशी आयडिया करून स्वत: आणि इतरांनाही कोरोनापासून वाचवू शकता.


Web Title: Coronavirus : Kids toothpick idea lets people minimize physical contact in lift api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.