CoronaVirus : आता मोरांनीसुद्धा दाखवलं सोशल डिस्टेंसिंगचं महत्व, पहा व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 01:10 PM2020-04-13T13:10:59+5:302020-04-13T13:36:27+5:30

कोरोना व्हायरस एका संक्रमित व्यक्तीकडून इतर व्यक्तींकडे पसरत जातो. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग पाळणं गरजेचं आहे.

CoronaVirus : National birds peacock teaching the lesson of social distancing amid coronavirus lockdown myb | CoronaVirus : आता मोरांनीसुद्धा दाखवलं सोशल डिस्टेंसिंगचं महत्व, पहा व्हायरल फोटो

CoronaVirus : आता मोरांनीसुद्धा दाखवलं सोशल डिस्टेंसिंगचं महत्व, पहा व्हायरल फोटो

Next

 भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनााचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून सोशल डिस्टसिंगचं महत्व सांगितलं जात आहे.  कारण कोरोनाचा आजार एका संक्रमित व्यक्तीकडून इतर व्यक्तींकडे पसरत जातो. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग पाळणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला असाच एक फोटो दाखवणार आहोत. या फोटोमध्ये चक्क मोरांनी सोशल डिस्टेंसिंग पाळलेलं दिसून येत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मोर बसलेले आहेत.  हा  फोटो आईएफएस ऑफिसर प्रवीन कासवान यांनी शेअर केला आहे. सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचं पालन करत मोर एकत्र बसले आहेत. १० एप्रिलला हा फोटो शेअर केला होता. ( हे पण वाचा- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दुसऱ्या पत्नीकडे जाऊन बसलाय पती, पहिल्या पत्नीची पोलिसात तक्रार आणि....)

राष्ट्रीय पक्षी मोराकडून शिकण्यासारखं खूप आहे. असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. हा फोटो नागौर जिल्ह्यातील सरकारी शाळेतील आहे. यासोबतचं अनेक कंमेट्समध्ये इतर अनेक प्राण्यांचे सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचे फोटो तुम्हाला दिसून येतील. कोरोनाला जर रोखायचंं असेल तर सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त समाजातचं नाही तर घरी सुद्धा या गोष्टींचे पालन करायला हवं. ( हे पण वाचा-धक्कादायक! 'ती' मदतीसाठी ओरडत राहिली पण कुणी आलं नाही, उभ्यानेच बाळाला दिला जन्म!)

Web Title: CoronaVirus : National birds peacock teaching the lesson of social distancing amid coronavirus lockdown myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.