CoronaVirus News : मुक्या जनावरांना समजलं; माणसांना कधी कळणार? फोटो झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 07:12 PM2020-05-01T19:12:46+5:302020-05-01T19:14:41+5:30

एकिकडे कोरोनामुळे जगभरात २ लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तरी काही लोकांना अजूनही सोशल डिस्टेंसिंगचं महत्व समजलेलं नाही. 

CoronaVirus News Marathi : Viral picture of dog have a lesson on social distancing myb | CoronaVirus News : मुक्या जनावरांना समजलं; माणसांना कधी कळणार? फोटो झाला व्हायरल

CoronaVirus News : मुक्या जनावरांना समजलं; माणसांना कधी कळणार? फोटो झाला व्हायरल

Next

सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्याासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे.  लॉकडाऊन जरी संपलं तरी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करण्याशिवाय पर्याय नाही. कारण कोरोनाच्या महामारीपासून स्वतःचा आणि समाजाचा बचाव करायचा असेल तर वैयक्तीक स्वच्छतेसोबतच सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं गरजेचं आहे. एकिकडे कोरोनामुळे जगभरात २ लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तरी काही लोकांना अजूनही सोशल डिस्टेंसिंगचं महत्व समजलेलं नाही. 

सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. यात तीन माणसं एकमेकांच्या जवळ उभी असून सोशल डिस्टेंसिंगचे पालन करताना दिसून येत नाहीयेत. याच माणसाच्या मागे बसलेल्या एका मुक्या प्राण्याने मात्र सोशल डिस्टेंसिंग पाळले आहे.  हा फोटो कुठला आहे. याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही. (हे पण वाचा-मांजरीचं पिल्लू आजारी पडलं; मग काय या मनीमाऊने स्वतःच रुग्णालयात नेलं, पाहा व्हायरल फोटो)

पोलीस अधिकारी राहुल श्रीवास्तव यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोला आत्तापर्यंत ९० लाईक्स आणि  १४ रिट्वीट्स मिळाले आहेत. या फोटोतील कुत्र्याने सोशल डिस्टेंसिंग पाळल्यामुळे  मुक्या जनावरांना जे समजतं ते मोठ्या माणसांना का समजत नाही अशा आशयाच्या कंमेंट्स या फोटोवर येत आहेत. ( हे पण वाचा-वेदनादायी! भुकेने व्याकूळ झालेल्या मुलांना शांत करण्यासाठी आईने पाण्यात उकळले दगड)

Web Title: CoronaVirus News Marathi : Viral picture of dog have a lesson on social distancing myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.