कर्तृत्वाला सलाम! महिला पोलिसाने भागवली गरीबाची भूक, पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 06:33 PM2020-04-10T18:33:30+5:302020-04-10T18:44:47+5:30
ह व्हिडीओ पाहून तुम्ही खाकीला नक्की सॅल्युट कराल.
सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशा परिस्थीतीत समाजातील काही लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हातावर पोट असलेल्या, लोकांकडून भीक मागून आपलं पोट भरत असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याच्या स्थितीत या लोकांना आधार देण्याची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला एका महिला पोलिसाचा व्हिडीओ दाखवणार आहोत.
लोकांना मदत करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्याच्या घटना तुम्हाला माहीत असतील पोलीसच गोरगरीब लोकांसाठी देवदूत बनून मदतीचा हात देत आहेत. आज आम्ही तुम्हाला महिला पोलिसाचा असाच एक व्हिडीयो दाखवणार आहोत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही खाकीला नक्की सॅल्युट कराल.
मैं इन पुलिस वालों की ज़ुबान नहीं समझ पाया... पर इतना समझ गया कि वर्दी पहनते हुए इन्होंने जो शपथ ली थी, वो इन्हें ज़ुबानी याद है. Respects. 🙏 pic.twitter.com/YQpbZ6HgIA
— Manoj Muntashir (@manojmuntashir) April 10, 2020
हा व्हिडीओ गीतकार मनोज मुंतशीर यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला पोलिस कर्मचारी एका रस्त्यावर बसलेल्या बाईला आपल्या हातांनी जेवण भरवत आहे. ही पोलीस कर्मचारी ज्या महिलेला जेवण भरवत आहे. ती महिला मानसिकदृष्या आजारी आहे. तर हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. तसंच या पोलीसांचं खूप कौतुक केलं जात आहे.