Coronavirus : 'हा' व्हिडीओ दाखवेल रेस्टॉरन्टमध्ये किती वेगाने पसरतो कोरोना व्हायरस!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 01:17 PM2020-05-12T13:17:26+5:302020-05-12T13:23:51+5:30
यात एक प्रयोग केला गेलाय. यात तुम्हाला कळेल की, व्हायरसला नष्ट न करता लॉकडाऊन संपवलं तर हा व्हायरस कशाप्रकारे पसरेल.
कोरोना व्हायरसच्या थैमानातून बचावासाठी कितीतरी उपाय निकामी ठरले आहेत. अशात कोरोनाच्या रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना असं वाटत आहे की, आता आपल्याला कोरोनासोबतच जगावं लागेल. दरम्यान अशात एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जपानमधील एक रेस्टॉरन्टचा व्हिडीओ आहे. यात एक प्रयोग केला गेलाय. यात तुम्हाला कळेल की, व्हायरसला नष्ट न करता लॉकडाऊन संपवलं तर हा व्हायरस कशाप्रकारे पसरेल.
A restaurant in Japan did an experiment showing how fast a ‘virus’ spreads that setting... pic.twitter.com/kLIX2986OG
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) May 11, 2020
या व्हिडीओत एका व्यक्तीने हातावर एक द्रव्य पदार्थ लावला. काही वेळासाठी या पदार्थाला तुम्हाला कोरोना व्हायरस समजा. नंतर ही व्यक्ती मित्रांसोबत रेस्टॉरन्टमध्ये जेवण करते. मित्रांसोबत गप्पा करतो. तोपर्यंत त्या द्रव्य पदार्थांच इन्फेक्शन दूरपर्यंत पोहोचतं. सगळीकडे तो पदार्थ दिसू लागतो. म्हणजे व्हायरस किती वेगाने आणि कसा पसरतो हे यात दाखवलं आहे.
The customers after seeing their food pic.twitter.com/aejVHg4PCB
— Peter Griffin Burner (@PeterGriffinAcc) May 12, 2020
So dont go to this restaurant
— SP 1975 (@flashg08) May 11, 2020
Customers when their food tastes funny then watch this: pic.twitter.com/zmjwDOcL2I
— Chad (@ChadBlue_) May 12, 2020
Customers leaving the restaurant like: pic.twitter.com/rahxWrIl4U
— Chad (@ChadBlue_) May 12, 2020
म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की, लॉकडाऊन संपवून सामान्य जीवन जगता येईल तर आता ते विसरा. कारण कोरोना इतक्या सहज तरी नष्ट होताना दिसत नाहीये.