CorovaVirus : संतापजनक! कोरोनाच्या संशयावरून शेजाऱ्यांनी केला डॉक्टर महिलेला शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 05:45 PM2020-04-06T17:45:59+5:302020-04-06T17:57:17+5:30
संपूर्ण देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता लोकांना बाहेर जाण्यास पूर्णपणे मनाई आहे. अशातच एक संतापजनक घटना समोर आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. जगभरासह भारतातसुद्धा झपाट्याने पसरत कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. संपूर्ण देशभरात अत्यावश्यक सेवा वगळता लोकांना बाहेर जाण्यास पूर्णपणे मनाई आहे. अशातच एक संतापजनक घटना समोर आली आहे.
कोरोनापासून देशाला वाचवण्यासाठी पोलीस, नर्स, डॉक्टरर्स, हॉस्पिटलचा स्टाफ प्रयत्नरत आहे. एकाप्रकारे लोकांचे सेवक बनून दिवसरात्र हे काम करत आहेत. अशी परिस्थिती असताना सुद्धा डॉक्टर महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक महिला डॉक्टर घरी आल्यानंतर तिच्या कुत्र्याला घेऊन बाहेर गेली असता शेजाऱ्यांनी तिच्याशी आरेरावी करत चुकीची वागणूक केली. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वाद घातला आहे. तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल असं तिच्याशी वाद घालत असलेल्याचं म्हणणं होतं. ही घटना सुरतमधील एका इमारतीमधील आहे.
सूरत के सिविल अस्पताल की महिला डोक्टर ने पड़ोसियों पर लगाया बदसलूकी का आरोप।
— Janak Dave (@dave_janak) April 6, 2020
अस्पताल में रहने के चलते महिला डॉक्टर #कोरोना संक्रमित तो नही ऐसे सवाल करके बदसलूकी करने का महिला डोक्टर का आरोप।
जब वह अपने पालतू कुत्ते के साथ बाहर गयी तब बदसलूकी की गई।@CP_SuratCitypic.twitter.com/dD35ncUdXX
या सगळ्या प्रकाराचा डॉक्टर महिलेने व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने शेजाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तापस सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. हरभन सिंग याने सुद्धा या व्हिडीओवर आपली संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
😡😡😡😡😡 https://t.co/uDngCuWRKs
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 6, 2020