बापरे! पालिकेच्या ऑनलाईन बैठकीदरम्यान कॅमेरा राहिला सुरु; भलताच प्रकार झाला कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 05:00 PM2020-08-20T17:00:54+5:302020-08-20T17:01:32+5:30
रिओ दि जनेरिया शहराच्या पालिकेची ही बैठक होती. त्यात कोरोना महामारी काळात महापालिका यंत्रणेने कशारितीने विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे यावर बैठकीत चर्चा सुरु होती.
जगभरात कोरोनाचं सकट आल्यापासून अनेक कंपन्या, शासकीय कार्यालये लॉकडाऊनमुळे बंद आहेत. अशातच हळूहळू डिजीटलच्या माध्यमातून अनेक कंपन्यांनी कामकाज सुरु केले आहे. यासाठी विविध अँप्सचा वापर करुन मिटींग घेतल्या जातात. वर्क फ्रॉम होम या संकल्पनेमुळे लोकांना घराबाहेर पडता येत नसले तरी इंटरनेटच्या मदतीनं कामं करता येतात.
ब्राझीलमध्ये एका मिटींगवेळी भलताच प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झूमवर सुरु असलेल्या मिटींगमध्ये एकजण कॅमेरा बंद करायला विसरला आणि कॅमेऱ्यात एक दाम्पत्य सेक्स करताना कैद झालं. समाजवादी आणि लिबर्टी पार्टीचे सदस्य लिओनेल ब्रिजोला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. झूम मिटींगदरम्यान ही दृश्य दिसत असतानाही त्यांनी आपली मिटींग सुरुच ठेवली होती.
रिओ दि जनेरिया शहराच्या पालिकेची ही बैठक होती. त्यात कोरोना महामारी काळात महापालिका यंत्रणेने कशारितीने विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे यावर बैठकीत चर्चा सुरु होती. मात्र या झूम मिटींग दरम्यान एकजण बैठकीतून उठला मात्र तो कॅमेरा बंद करायला विसरला आणि त्यानंतर जे घडले ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. मिटींगच्या दरम्यान एका कॅमेऱ्याच्या विंडोमध्ये सेक्स करताना कपल्स दिसत होते. ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता बैठकीला सुरुवात झाली. पण बैठक सुरु असताना चर्चेमधून एकजण उठला पण त्याने कॅमेरा बंद केला नाही.
स्थानिक वृत्तपत्रानुसार हा सदस्य पालिकेचा नगरसेवक नव्हता. कॅमेऱ्यात ही दृश्य सुरु असतानाही पुढील ४ तास कोणताही व्यत्यय न येता बैठक सुरुच ठेवण्यात आली. बैठकीतल्या इतर नगरसेवकांच्या हा प्रकार लक्षात आला मात्र त्यांनी दुर्लक्ष करुन बैठकीतील विषयांवर चर्चा करणे सुरुच ठेवले. यानंतर ब्रिजोला यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं की, बैठकीत जे घडले ते अयोग्यच आहे पण बैठकीत ज्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली त्याकडे माध्यमांनी दुर्लक्ष केले.
तसेच मिटींग दरम्यान जेव्हा हा प्रकार आमच्या लक्षात आला तेव्हा ताबडतोब ऑडिओ आणि व्हिडीओ नियंत्रित करणाऱ्या टीमला फीड बंद करण्यास सांगितले. कारण झूम कॉलमध्ये असणाऱ्या नगरसेवक आणि इतर सदस्यांना हा व्हिडीओ नियंत्रित करणं शक्य नव्हता. या बैठकीत मुलांच्या जेवणाची हमी कशारितीने घ्यावी यावर चर्चा केली मात्र संबंधित सदस्यावर कोणती कारवाई करणार याबाबत स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला.