धार्मिक कार्यक्रमात ४५ मिनिटं कपलचा सुरू राहिला लाइव्ह रोमान्स, लोकांनी केला रोखण्याचा प्रयत्न पण…

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 01:10 PM2022-05-30T13:10:27+5:302022-05-30T13:12:03+5:30

Zoom कॉलदरम्यान कपलचा व्हिडीओ ऑन राहिला होता. त्यांचे खासगी क्षणही यावेळी कॅमेऱ्यात कैद झाले.

couple caught making romance zoom video call religious service social media america | धार्मिक कार्यक्रमात ४५ मिनिटं कपलचा सुरू राहिला लाइव्ह रोमान्स, लोकांनी केला रोखण्याचा प्रयत्न पण…

धार्मिक कार्यक्रमात ४५ मिनिटं कपलचा सुरू राहिला लाइव्ह रोमान्स, लोकांनी केला रोखण्याचा प्रयत्न पण…

Next

सध्या झूम मीटिंग्स किंवा ऑनलाइन मीटिंग्स वाढल्या आहेत. कोणत्याही एका ठिकाणी न जाता व्हर्च्युअली अनेकांना एकत्र येता येतं. परंतु एका ऑनलाइन मीटिंगमध्ये असं काही घडलं ज्यामुळे सर्वांचीच मान शरमेनं झुकली.

झूम कॉलवरून एका धार्मिक कार्यक्रमाचं (Bat Mitzvah of Temple Beth El) आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक जण सहभागी झाले होतं. परंतु कार्यक्रमादरम्यान एका कपलचा व्हिडीओ आणि माईक ऑन राहिला होता. परंतु त्यांना आपला व्हिडीओही बंद आणि माईकही म्यूट असल्याचं वाटलं. परंतु त्यांचा व्हिडीओ ऑन राहिला होता आणि यादरम्यान, त्यांचे काही खासगी क्षण कॅमेऱ्यावर रेकॉर्ड झाले.

आश्चर्याची बाब म्हणजे या कपलचा ४५ मिनिटं रोमान्स सुरू होता. परंतु त्यांना झूम कॉलदरम्यान कॅमेरा आणि माईक सुरू असल्याचं समजलं नाही. यादरम्यान अनेकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी यावर लक्ष दिलं नाही. परंतु नंतर त्यांना वैयक्तिकरित्या मेसेज करण्यात आला, त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

अमेरिकेतील घटना
ही घटना अमेरिकेतील असून त्यांची ओळख समोर आणण्यात आलेली नाही. व्हिडीओमध्ये कपल रोमान्स करताना दिसत होते. ही अशी काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा घटना समोर आल्या होत्या.

Web Title: couple caught making romance zoom video call religious service social media america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.