तरुण अन् तरुणी करत होते डान्स, इतक्यात असं काही घडलं की दोघांना वाटू लागली लाज...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 06:06 PM2021-09-12T18:06:02+5:302021-09-12T18:06:50+5:30
एका कपलला त्यांचा अतिउत्साह महागात पडलाय. हे कपल उत्साहाच्या भरात अगदी उड्या मारत मारत डान्स करायला गेले अचानक असं काही झालं की त्यांनाच त्यांची लाज वाटू लागली...
तुम्ही एखाद्या गोष्टीत कितीही तरबेज असलात तरी तुमची एखादी चूक तुम्हाला महागात पडू शकते. काहीवेळा अतिउत्साहाच्या भरात केलेल्या गोष्टींमुळे पश्चातापाची वेळ येते. तुमची फजिती होते ती वेगळीच पण तुम्ही सर्वांच्या चेष्टेचा विषय बनून जाता. अशाच एका कपलला त्यांचा अतिउत्साह महागात पडलाय. हे कपल उत्साहाच्या भरात अगदी उड्या मारत मारत डान्स करायला गेले अचानक असं काही झालं की त्यांनाच त्यांची लाज वाटू लागली...
सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर एका कार्यक्रमातील डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल हसत-खेळतं कार्यक्रमात प्रवेश करतं. दोघंही अगदी मजेत लोकांसमोर डान्स करत असतात. त्यांची केमिस्ट्री तिथे उपस्थित सर्वांनाच आवडते. मात्र, काही वेळातच डान्स करणारं हे कपल जास्तच उत्साही होतं आणि तरुणी डान्स करता करताच अचानक युवकाच्या पाठीवर चढते. पुढे जे काही घडतं ते अतिशय मजेशीर आहे.
तरुणी पाठीवर चढल्यानंतर काही वेळ हा मुलगा स्वतःला बॅलन्स करतो. मात्र, इतक्यात त्याचा बॅलन्स बिघडतो आणि दोघंही धाडकन खाली कोसळतात. हा व्हायरल डान्स व्हिडिओ hepgul5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ९४ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. कपलची अवस्था पाहून अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.