इमोशनल अत्याचार! 'या' कपलची ट्विटरवरील Love Story झाली व्हायरल, सिंगल लोकांनी व्यक्त केल्या वेदना....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 04:13 PM2020-12-15T16:13:08+5:302020-12-15T16:14:18+5:30

रविवार म्हणजे १३ डिसेंबरला Yara ने ट्विटरवर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आणि लिहिले की, मी त्या व्यक्तीसोबत लग्न केलं ज्याला मी ट्विटरवर भेटले होते.

couple find love on twitter got engaged viral news | इमोशनल अत्याचार! 'या' कपलची ट्विटरवरील Love Story झाली व्हायरल, सिंगल लोकांनी व्यक्त केल्या वेदना....

इमोशनल अत्याचार! 'या' कपलची ट्विटरवरील Love Story झाली व्हायरल, सिंगल लोकांनी व्यक्त केल्या वेदना....

googlenewsNext

खऱ्या प्रेमाच्या शोधात बरेच लोक डेटींग अॅप्सचा आधार घेतात. पण अनेक प्रयत्न करूनही त्यांच्या हाती काही लागत नाही. पण ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका कपलच्या लव्हस्टोरीने अनेकांमध्ये अपेक्षा जागृत झाली आहे. या कपलची भेट ट्विटरवर झाली आणि नुकताच दोघांनी साखरपु़डाही केला. मीडिया रिपोर्टनुसार, Yara ही एक कॉम्प्युटर इंजिनिअर आहे जी अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्ये राहतो. तर तिचा होणार पती Beshoy एक सिव्हील इंजिनिअर आहे. दोघांची भेट ट्विटरवर झाली. दोघात प्रेम झालं आणि आता दोघेही लग्न करणार आहेत.

रविवार म्हणजे १३ डिसेंबरला Yara ने ट्विटरवर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आणि लिहिले की, मी त्या व्यक्तीसोबत लग्न केलं ज्याला मी ट्विटरवर भेटले होते. तिचं हे ट्विट व्हायरल झालं आहे. आतापर्यंत या ट्विटला १ लाख  ७२ हजार लाइक्स आणि ८.५  हजार रि-ट्विट मिळाले आहेत. सोबत शेकडो लोकांनी यावर कमेंटही केल्या आहे.

अनेकांनी या प्रकरणावर हैराणी व्यक्त केली तर काही लोकांनी सिंगल लोकांच्या वेदनाही व्यक्त केल्याय. काही यूजर्सनी लिहिले की, त्यांना वाटतंय की, ते चुकीचं ट्विटर वापरत आहेत. तर एक यूजर म्हणाला की, त्याला वाटतं की, टिंडर सोडून बाकी सर्व अॅप्स आपलं काम चांगलं करत आहेत. 
 

Web Title: couple find love on twitter got engaged viral news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.