वृद्ध महिलेला मदत करायला गेले पण स्वत:चा जीव वाचवला, कसा? पाहा video
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 07:16 PM2021-12-06T19:16:39+5:302021-12-06T19:16:51+5:30
आपण कधी कुणाचं चांगलं केलं, वा चांगलं करण्याचा प्रयत्नही केला तरी आपल्यासोबत कधीही वाईट होत नाही असं म्हणतात, याचीच प्रचिती देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप शेअर होत आहे. या व्हिडीओमध्ये कुणाची केलेली मदत, कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, हेच दिसतं.
आपण कधी कुणाचं चांगलं केलं, वा चांगलं करण्याचा प्रयत्नही केला तरी आपल्यासोबत कधीही वाईट होत नाही असं म्हणतात, याचीच प्रचिती देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप शेअर होत आहे. या व्हिडीओमध्ये कुणाची केलेली मदत, कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, हेच दिसतं.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका जोडप्याचा आणि एका वृद्ध महिलेचा आहे, ज्यामध्ये महिलेला मदतीची गरज आहे आणि हे जोडपे तिच्या मदतीसाठी पोहोचले, पण त्याआधी हे जोडपे आपापसात भांडतात आणि वृद्ध महिलेकडे लक्ष देत नव्हते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काठीच्या आधाराने चालणाऱ्या एक वृद्ध महिलेच्या हातात भाजीची पिशवी आहे, जी रस्ता ओलांडल्यानंतर खाली पडते आणि त्यातील सगळा भाजीपाला रस्त्यावर विखुरतो.
त्याच वेळी, काही अंतरावर, एक जोडपं आपापसात काहीतरी भांडत आहे. मुलीचे लक्ष त्या वृद्ध महिलेकडे जातं आणि ती या वृद्ध महिलेच्या मदतीसाठी जाण्याचा प्रयत्न करते. तिला मदतीसाठी जायचं असतं, पण भांडण करणारा तिचा पार्टनर तिला अडवतो. पण थोड्या वेळाने ही मुलगी, मुलाचा हात झटकते आणि या वृद्ध महिलेच्या मदतीला जाते. हे पाहून तो मुलगाही रस्त्यावर मुलीच्या मागे जातो, आणि तितक्यात ते ज्या खांबाखाली उभे असतात, तिथं एक मोठा बॅनर कोसळतो. नशीबाने हा मुलगा तिथून हलल्याने त्याला काही इजा होत नाही. त्यानंतर आपली चूक या मुलाच्या लक्षात येते, आणि तो या आजीच्या डोक्यावर चुंबन घेतो.
किसी के लिए अच्छा करो, बदले में अच्छा ही मिलेगा. pic.twitter.com/oUZSScjkKZ
— Awanish Sharan (@AwanishSharan) December 5, 2021
हा अप्रतिम व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला असून, ‘एखाद्याचे भले करा, बदल्यात तुम्हाला चांगलं मिळेल’, असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 28 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडिओवर उत्तम कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘चांगुलपणा किंवा उपकार कधीही व्यर्थ जात नाही’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘म्हणूनच गरजू व्यक्तीला वेळीच मदत केली पाहिजे’ असे म्हटले आहे.