अरे बाप रे बाप! कपलने शोधला 'मेगालोडन शॉर्क' 'विशाल दात', व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांची बोलती झाली बंद...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:21 PM2020-06-17T12:21:43+5:302020-06-17T12:21:59+5:30
बरेच दिवस त्याचा शोध घेतल्यानंतर त्यांना हा दात सापडला. असे सांगितले जात आहे की, हा दात जवळपास 3 मिलियन वर्ष जुना आहे.
दक्षिण कॅरोलिनातील एका कपलने मेगालोडन शार्कचा दात शोधला आहे. या शार्कचा दात 1 किंवा 2 इंचाचा नाही तर चक्क 5.75 इंचाचा असतो. म्हणजे जवळपास मनुष्याच्या हाताच्या पंजा इतका मोठा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेसिका रोज-स्टॅंडर ओवेन्स आणि तिचा पती सायमन चार्ल्सटनच्या घराबाहेर स्टोनो नदीजवळ शार्कचा दात असल्याची माहिती मिळाली होती. बरेच दिवस त्याचा शोध घेतल्यानंतर त्यांना हा दात सापडला. असे सांगितले जात आहे की, हा दात जवळपास 3 मिलियन वर्ष जुना आहे.
जेसिका म्हणाली की, '17 मे रोजी तिने आणि तिच्या पतीने शार्कचा दात शोधण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान त्यांना नदीच्या किनाऱ्यावर एका जुन्या झाडाखाली शार्कचा दात सापडला.जेसिका ही वैज्ञानिक आहे. काही दिवसांपूर्वी तिला याबाबत माहिती मिळाली होती क, या ठिकाणी एका विशाल शार्कचा दात दडला आहे. त्यानंतर त्यांनी लगेच शोधमोहिम हाती घेतली.
शार्कचा दात शोधल्यानंतर कपलने त्यांच्या फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. या व्हिडीओत त्यांना दात कसा आणि कुठे सापडला हे बघितलं जाऊ शकतं. इतक्या मोठ्या दाताकडे बघून अनेकजण हैराण झाले. या दाताची साइज 5.75 इंच सांगितली जात आहे.
@rosethescientist If I never find another shark tooth, I will be just fine. @captknotsmith ##charlestonsc##sharktooth##megalodon##shark##excited
♬ original sound - rosethescientist
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, चार्ल्सटनच्या कॉलेजमध्ये मेस ब्राउन म्युझिअम ऑफ नॅच्युरल हिस्ट्रीमध्ये या शोधाबाबत उल्लेख आहे. या शोधाला एक महाना शोध सांगण्यात आले आहे. दोघांचाही शार्कचा दात शोधण्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 1.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
Video : 'या' तरूणाचा स्टंट पाहून तुम्ही मोगली, बगिरा, स्पायडर मॅन इतकंच काय सुपरमॅनला सुद्धा विसराल