थरारक व्हिडीओ! समुद्रकिनारी कपल करत होतं वेडींग फोटोशूट, मोठी लाट आली अन् त्यांना घेऊन गेली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 10:33 AM2020-07-03T10:33:12+5:302020-07-03T10:47:04+5:30
समुद्रकिनारी फोटोशूट करणं एका कपलला चांगलंच महागात पडलं. सुदैवाने लाइफगार्ड्सनी त्यांची जीव वाचवला.
सध्या कोरोनामुळे अनेक बंधनं लोकांवर आली आहेत. अनेक महत्वाची कामे करता येत नाहीयेत. अनेकांना लग्न कॅन्सल करावी लागली. पण काही लोक या काळातही लग्न करत आहेत. इतकेच नाही तर एक कपलने तर समुद्रकिनारी चक्क वेडींग फोटोशूटही केलं. आणि हे फोटोशूट करणं त्यांना चांगलंच महागात पडलं. काही सेकंदात स्थिती इतकी बदलली की, लाइफ गार्ड्सना पाण्यात उडी घ्यावी लागली.
TO THE RESCUE: Lifeguards saved a wedding couple that was swept into the Pacific Ocean while taking photos in Southern California. https://t.co/mScYDkMWmhpic.twitter.com/RTvJQmzFC2
— ABC News (@ABC) July 1, 2020
हा व्हिडीओ एबीसी न्यूजने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलाय. याच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'दक्षिण कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनारी एक कपल वेडींग फोटोशूट करत होतं. अचानक एक मोठी लाट आली आणि दोघेही प्रशांत महासागरात वाहून गेले. सुदैवाने लाइफगार्ड्सनी त्यांना सुरक्षित बाहेर काढले'. या थरारक व्हिडीओला आतापर्यंत 444.9 हजार व्ह्यूज मिळाले आणि 3 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
Holy shit! Everyone should see this to remember how powerful the ocean is
— concerned citizen (@srsinger40) July 1, 2020
Never turn your back to the ocean. Ever.
— Lindsey. 🥥 (@Linds_Zolna) July 2, 2020
यात तुम्ही बघू शकता की, कपल समुद्र किनारी असलेल्या खडकावर फोटोशूट करत आहे. कॅमेरामन फोटो क्लिक करत आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक एक मोठी लाट येते आणि दोघांनाही सोबत घेऊन जाते. दैव बलवत्तर म्हणून तिथे उपस्थित असलेल्या लाइफगार्ड्सनी कपलला वेळीच पाण्यातून बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला.
Nature is telling them that the union was not meant to be
— Prince Kambale M (@Prince_kambale) July 1, 2020
Very lucky
— MotherofGrace (@woodysgal3) July 2, 2020
हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का तर बसतो आहेच. पण अनेकजण कमेंटही करत आहेत. अनेकांचं असं मत आहे की, फोटोंसाठी इतकी जोखिम घेण्याची गरज काय? तसेच अनेकांनी हे म्हटलं आहे की, समुद्राच्या पॉवरला कमी समजू नका. तर काहीजण म्हणाले की, दोघेही जिवंत आहेत हे त्यांचं नशीबच आहे.