कोविड झाल्यानंतरही रुग्णालयात परिक्षेची तयारी करताना दिसला तरूण ; IAS अधिकारी म्हणाले.....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 03:56 PM2021-04-28T15:56:21+5:302021-04-28T16:00:06+5:30
Covid patient preparing for ca exam : या तरूणाच्या बेडवर कॅल्यूलेटर, पुस्तकं सारं काही ठेवलं असून तीन लोक पीपीई किट घालून त्याच्या समोर उभे आहेत.
कोरोना व्हायसरनं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यत सगळ्यांनाच आपलं शिकार बनवायला सुरूवात केली आहे. दरम्यान या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे फारसं लक्ष देता येत नाहीये. सोशल मीडियावर अशाच ओडिसाच्या (Odisha) विद्यार्थ्याचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे कोरोना संक्रमित असूनही हा तरूण रुग्णालयात परिक्षेची तयारी करताना दिसून येत आहे. चार्टर्ड एकाउंटंट्सच्या परीक्षेची तयारी (Covid Patient Preparing For CA Exam) सुरू असल्याची माहिती या तरूणानं दिली आहे.
Success is not coincidence. You need dedication. I visited Covid hospital & found this guy doing study of CA exam. Your dedication makes you forget your pain. After that Success is only formality. pic.twitter.com/vbIqcoAyRH
— Vijay IAS (@Vijaykulange) April 28, 2021
या तरूणाच्या बेडवर कॅल्यूलेटर, पुस्तकं सारं काही ठेवलं असून तीन लोक पीपीई किट घालून त्याच्या समोर उभे आहेत. गंजम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय कुलंगे यांनी बेरहमपूरच्या एमकेसीजी मेडिकल कॉलेज रुग्णालयात भेट दिली तेव्हा हा फोटो काढण्यात आला. कुलंगे यांनी ट्विटरवर हे चित्र शेअर केले आणि रुग्णाचे कौतुक केले. आयएएस अधिकारी यांनी लिहिले की, 'यश हा योगायोग नाही. आपण सपर्मण करणं आवश्यक आहे.' आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला
ते म्हणाले, "मी कोविड हॉस्पिटलला गेलो आणि ही व्यक्ती परीक्षेचा अभ्यास करत होती. आपले समर्पण आपल्याला आपल्या वेदना विसरायला लावते. त्यानंतर यश केवळ औपचारिकता आहे." आतापर्यंत या फोटोला ३१ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी रविवारी 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सर्व लोकांना कोविड लसीकरण मोफत जाहीर केले. सध्या ओडिसा सहा राज्यांना ऑक्सिजन पुरवित आहे. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं