Viral Video: तमाशा पाहत राहिली लोक पण गायीने वाचवले कुत्र्याला, व्हिडिओ पाहुन व्हाल भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 02:49 PM2022-03-24T14:49:00+5:302022-03-24T14:50:02+5:30
कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? माणसांपेक्षाही खरी माणूसकी ही प्राण्यांमध्ये असते. एखादी दुर्घटना घडताना माणसं एखादवेळेस बघत राहतील. मोबाईलने ...
कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? माणसांपेक्षाही खरी माणूसकी ही प्राण्यांमध्ये असते. एखादी दुर्घटना घडताना माणसं एखादवेळेस बघत राहतील. मोबाईलने व्हिडिओ काढण्यात गुंग असतील पण प्राणी त्या संकटकाळात अडकलेल्या मदत करण्यातच धन्यता मानतात. तुम्हाला खरं वाटत नसेल तर हा खालील व्हिडिओ हे सिद्ध करेल.
व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती कुत्र्याचे कान खेचतोय. कुत्रा वेदनेने किंचाळत असतो, ओरडत असतो. पण या व्यक्तीला अजिबात दया आली नाही. ही व्यक्तीच कशाला तिच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत पण कुणालाही या कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून पाझऱ फुटला नाही. कुणीही त्या कुत्र्याच्या मदतीला आलं नाही. या क्रूर व्यक्तीच्या तावडीतून सुटका केली नाही. माणसं दगड झाली पण मुके जीव नाही. या कुत्र्याचा आवाज एका गाईच्या कानावर पडला आणि ती त्याच्या मदतीसाठी धावून आली. गायीने या कुत्र्याला क्रूर माणसाच्या तावडीतून सोडवण्यासाठी धडपड केली.
गाय तशी शांत, सहसा ती कुणावर हल्ला करत नाही. पण कुत्र्याचा असा छळ करणाऱ्या माणसांना पाहून मात्र ती इतकी भडकली अगदी बैलासारखी ती त्याच्यावर तुटून पडली. त्या व्यक्तीला आपल्या शिंगांनी उडवून जमिनीवर आपटलं. कुत्रा त्या माणसाच्या तावडीतून सुटला आणि संधी मिळताच त्याने तिथून पळ काढला.
Karma 🙏🙏 pic.twitter.com/AzduZTqXH6
— Susanta Nanda IFS (@susantananda3) October 31, 2021
हा व्हिडीओ तसा जुना आहे पण सुशांत नंदा यांनी ट्वीटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. जे काम एक माणूस करू शकला नाही ते गोमाताने केलं, कोणतीही आई असो ती कुणाच्याच वेदना सहन करू शकत नाही, अशा प्रतिक्रिया युझर्सनी दिल्या आहेत.