Video : झाडात अडकलेली गाईची मान; लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न करताच तिनं केला 'असा' हल्ला.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 02:04 PM2021-02-16T14:04:28+5:302021-02-16T14:09:11+5:30

Trending Viral news in Marathi : ती माणसं गाईला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच गाय त्या झाडातून आपली मान वर काढते आणि त्या माणसांना धडक देऊन वेगाने पुढे निघून जाते.

Cow throat stuck in the tree people saved and then she attack on them see viral video | Video : झाडात अडकलेली गाईची मान; लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न करताच तिनं केला 'असा' हल्ला.... 

Video : झाडात अडकलेली गाईची मान; लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न करताच तिनं केला 'असा' हल्ला.... 

googlenewsNext

सोशल मीडियावर एका  गाईचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही लोट पोट होऊन हसाल. अनेकदा असं पाहिलं जातं की, कोणताही प्राणी अडचणीत असेल तर माणसं लगेचच मदतीला धावून जातात. पण या घटनेत मात्र एक विचित्र प्रकार घडला आहे. गाईची मान एका झाडाच्या आकारात अडकली होती. या  गाईला वाचवण्यासाठी दोन माणसं पुढे आलेली दिसून येत आहेत. 

आयएफएस अधिकारी अवनीष शरण (IAS Officer Awanish Sharan)  यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की  झाडांच्या खोडात गायीची मान अडकली आहे. ती मान बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. पण काहीही केल्या मान वर निघतच नाही. लोक तिच्या मदतीसाठी पुढे येतात. ती माणसं गाईला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच गाय त्या झाडातून आपली मान वर काढते आणि त्या माणसांना धडक देऊन वेगाने पुढे निघून जाते. काय सांगता? 'या' पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल मिळणार; फक्त मुलांना म्हणावे लागणार १० श्लोक

अवनीष शरण यांनी हा व्हिडीओ शेअर करत व्हिडीओला  कॅप्शन दिलं आहे की,  'भलाई का जमाना नही राहा.' हा व्हिडीओ  १३ फेब्रुवारीला  अवनीष शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला २१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या  व्हिडीओला मिळाले आहेत. २०० पेक्षा जास्त रि-ट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. माणुसकीला काळीमा! आधी मुक्या जीवाला दांड्यानं मारलं नंतर रस्त्यावरून नेलं फरपटत, व्हायरल फोटो 

Web Title: Cow throat stuck in the tree people saved and then she attack on them see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.