क्रिकेट फिव्हर, मित्रासाठी काय पण! नवरीसोबत भर मंडपात २० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर झाला करार आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 12:05 PM2022-09-14T12:05:59+5:302022-09-14T12:06:16+5:30
मॉर्डन जगात लग्नाआधी करार करणे हे काही नवीन नव्हे... त्यात अनेक अटी व शर्थी घातल्या जातात... तामिळनाडूच्या थेनी येथील एका प्राध्यापकाच्या लग्नात असाच एक करार झाला,
भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज होतोय... बीसीसीआयने नुकतीच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. तत्पूर्वी भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतीय चाहते आनंदात आहेत. भारतात क्रिकेटचं क्रेझ कितीय हे वेगळं सांगयला नको. त्यामुळेच लग्न मंडपातही क्रिकेटच्या सामन्यांचं थेट प्रक्षेपण दाखवण्याची सोय केलेली अनेकदा पाहिली गेली आहे. अशाच एका क्रिकेट वेड्या मित्रांनी लग्नमंडपात २० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नवरीसोबत करार करून घेतला अन् सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली..
मॉर्डन जगात लग्नाआधी करार करणे हे काही नवीन नव्हे... त्यात अनेक अटी व शर्थी घातल्या जातात... तामिळनाडूच्या थेनी येथील एका प्राध्यापकाच्या लग्नात असाच एक करार झाला, परंतु यात क्रिकेट फिव्हर होता. लग्नाआधी वर मुलग्याच्या मित्रांनी नवरी मुलीकडून एका करारावर स्वाक्षरी करून घेतली. नवरा मुलगा हरिप्रसाद हा तामिळनाडूतील स्थानिक संघ सुपरस्टारचा कर्णधार आहे आणि त्याच्या मित्रांनी २० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर एक करार लिहून आणला, त्यात त्यांनी विकेंडमध्ये हरिप्रसादला क्रिकेट खेळण्याची परवानगी द्यावी असे नमूद केले होते.
''मी पूजा, हरिप्रसाद याला शनिवार व रविवारी सुपर स्टार क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळण्याची परवानगी देते,''असे त्या करारात लिहिले होते. नवरी मुलगी पूजा हिला हे वाचून हसू आवरले नाही आणि तिने करारासोबत फोटोही काढून घेतला. तिने करारावर स्वाक्षरी करताच सारेच हसू लागले. लग्नानंतरही आपला कर्णधार क्रिकेट मॅचसाठी उपलब्ध असेल याचा आनंद मित्रांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कराराचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.