Morocco Victory, FIFA World Cup 2022 Video: विजयाचं सेलिब्रेशन असंही... मैदानात कौतुक करायला आलेल्या आईबरोबर खेळाडूने धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 01:02 PM2022-12-11T13:02:44+5:302022-12-11T13:03:30+5:30
मोरोक्कोने रोनाल्डोच्या पोर्तुगालला दाखवला स्पर्धेबाहेरचा रस्ता
Morocco player dance with Mother, FIFA World Cup 2022 Video: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो याचे FIFA World Cup 2022 जिंकण्याचे स्वप्न भंगले. सध्या सुरू असलेल्या बाद फेरीत, उपांत्य फेरीसाठी चारही संघ निश्चित झाले आहे. उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी मोरोक्कोने पोर्तुगालला पराभूत करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केल्याने मोठा धक्का बसला. यासह मोरोक्कोने स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंगले. मोरोक्कोने पोर्तुगालचा १-०ने पराभव केला. सामना संपताच रोनाल्डो मैदानात ढसाढसा रडू लागला. रोनाल्डो अश्रू पुसतच मैदानाबाहेर गेला, ते सर्वांनी पाहिलं आणि चाहतेही हळहळले. पण दुसरीकडे मोरोक्काच्या खेळाडूने विजयाचे सेलिब्रेशन चक्क आईसोबत डान्स करून केले.
एकीकडे रोनाल्डोच्या रडणाऱ्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होते, तर दुसरीकडे मोरोक्कोच्या खेळाडूंचे सेलिब्रेशनही चर्चेत आहे. या ऐतिहासिक सेलिब्रेशननंतर मोरोक्कोचा सुफियान बोफेल मैदानावर नाचताना दिसला. इतकेच नाही तर त्याने त्याच्या आईसोबत मैदानात डान्स केला. सुफियानची आई आपल्या मुलाला भेटण्यासाठी मैदानावर पोहोचली, तेथे दोघांनी डान्स करून आपल्या देशाचा विजय साजरा केला. पाहा व्हिडीओ-
Morocco's Sofiane Boufal celebrating with his mother is EVERYTHING.
— Ahmed Ali (@MrAhmednurAli) December 10, 2022
pic.twitter.com/h3XdhTeKe3
मोरोक्कोसाठी हा क्षण खूप ऐतिहासिक आहे. कारण फुटबॉल विश्वचषकाच्या ९२ वर्षांच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठणारा आफ्रिकन-अरब देशांचा तो पहिला संघ ठरला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे २०२२ च्या विश्वचषक स्पर्धेत मोरोक्कोने विरोधी खेळाडूकडून एकही गोल करून घेतला नाही. मोरोक्कोने कॅनडाविरुद्ध एक गोल केला होता पण तो एक सेल्फ गोल होता. म्हणजेच विरोधी संघांना त्यांनी अद्याप एकही गोल करून दिलेला नाही.