अचानक मगरीने केला हल्ला; हात शरीरापासून वेगळा करणार...पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 04:41 PM2024-03-06T16:41:38+5:302024-03-06T16:42:35+5:30
हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Video: पाण्यात राहुन मगरीशी वैर करायचे नाही, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. मगर हा असा प्राणी आहे, जो आपल्या जबड्यात आलेली शिकार जिवंत परत जाऊ देत नाही. अशा वन्य प्राण्यांपासून तुम्ही जितके अंतर राखाल, तितके चांगले असते. प्राणी संग्रहालयालामध्येही प्राण्यांच्या पिंजऱ्यापासून लांब राहण्याच्या सूचना दिल्या जातात. सध्या एका प्राणी संग्रहालयातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यात एक मगर त्याच्या केअर टेकरवरच हल्ला करते.
मगरीने जबड्यात हात पकडला
व्हायरल व्हिडिओ अमेरिकेतील उटाह येथील आहे. येथील स्केल अँड टेल रेप्टाइल सेंटरमधील साडेआठ फूट लांबीच्या मगरीने अचानक महिला केअर टेकरवर हल्ला केला. त्या मगरीने महिलेचा हात आपल्या जबड्यात पकडला आणि तो तोडण्याचा प्रयत्न करू लागली. यावेळी तिथे आलेले पर्यटकही घाबरुन गेले. त्या महिलेने मगरीच्या तोंडातून आपला हात बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण मगरीने तो घट्ट पकडून ठेवला होता.
व्हिडिओ पहा-
Crocodile attacks zoo keeper and a visitor jumps in the cage to help pic.twitter.com/IFUonmU18g
— non aesthetic things (@PicturesFoIder) March 1, 2024
थोडक्यात बचावला जीव
काही वेळानंतर एक व्यक्ती त्या मगरीच्या पिंजऱ्यात उडी मारतो आणि त्या मगरीला पकडून ठेवतो. यावेळी ती महिला आपला हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. अखेर त्या सेंटरमधील इतर कर्मचारी तिथे येतात आणि कसाबसा त्या महिलेला हात मगरीपासून मुक्त करतात. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2021 ची असून, या घटनेचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हल्ल्यात हाताची हाडे मोडली
एका मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेत 31 वर्षीय महिलेच्या मनगटाची आणि हाताची हाडे तुटली. यामुळेच डॉक्टरांना तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. दरम्यान, नेटीझन्सकडून त्या महिलेचा जीव वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक होत आहे.